सलमान खान याने सावरला राखी – आदिल यांचा संसार; व्हिडीओतून सत्य समोर

| Updated on: Jan 17, 2023 | 10:17 AM

'अखेर भाईचा आदिला याला फोन आलाच...', लव्हगुरू म्हणून राखी हिच्यासाठी धावत आला सलमान खान ; थेट आदिल याला फोन करत भाईजानची मध्यस्थी

सलमान खान याने सावरला राखी - आदिल यांचा संसार; व्हिडीओतून सत्य समोर
सलमान खान याने सावरला राखी - आदिल यांचा संसार; व्हिडीओतून सत्य समोर
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत (rakhi sawant) आणि आदिल त्यांच्या लग्नामुळे तुफान चर्चा रंगली आहे. राखी आणि आदिल यांनी सात महिन्यांपूर्वी लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पण लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर आदिल लग्नाला नकार देत असल्याची माहिती समोर येत आहे. आता राखी आणि आदिल यांनी दोघांनी लग्न मान्य केलं आहे. दोघांचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राखी सतत अभिनेता सलमान खान याचं नाव घेताना दिसत आहे.

लव्हगुरू म्हणून राखी हिच्यासाठी सलमान खान धावत आला. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये समोर आलं आहे की, सलमानने राखीचा संसार सावरला आहे. राखी आणि आदिला यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, अनेकांनी व्हिडीओवर कमेंट देखील केल्या आहेत.

आदिलने लग्नाला नकार दिल्यानंतर राखी प्रचंड रडत होती. राखी पापाराझी यांच्यासमोर देखील रडताना दिसली. पण आता आदिलने सोशल मीडियावर एक पोस्ट करत राखी हिच्यासोबत लग्न झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. आदिलने नात्याचा स्वीकार केल्यानंतर दोघे एकत्र दिसले. तर सलमान याने आदिलला फोन केल्याचा खुलासा राखीने केला.

 

 

इन्स्टाग्रामवर इंस्टँट बॉलीवूडद्वारा पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये राखी म्हणते, ‘आला ना आदिल याला भाईचा फोन… भाई आहे तो माझा…’ एवढंच नाही तर आदिला सलमानचा जीजा असल्याचा उल्लेख देखील राखीने व्हिडीओमध्ये केला. आदिलने देखील याबाबत मोठा खुलासा केला आहे.

‘जे काही सत्य आहे, ते स्पष्ट कर. ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या मान्य कर नाहीतर नकार दे…’ असं सलमान आदिलला म्हणाला असं व्हिडीओतून समोर येत आहे. सलमानचा फोन आल्यानंतर आदिल आणि राखी यांच्यात असलेले विवाद संपल्याचं यावरुन दिसत आहे.

दरम्यान, आदिलने १६ जानेवारी रोजी एक पोस्ट केली आणि राखीसोबत लग्न मान्य केलं. पोस्टमध्ये आदिल म्हणाला, ‘मी तुझ्यासोबत लग्न केलं नाही, असं कधीच मी म्हणालो नाही. मला काही गोष्टी स्पष्ट करायाच्या होत्या. म्हणून मी शांत होतो.’ असं म्हणत आदिलने राखीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.