‘पटना शुक्ला’ OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर 29 मार्चपासून प्रदर्शित होत आहे. अरबाज खान निर्मित सिनेमाचं स्क्रिनिंग गुरुवारी आयोजित करण्यात आलं होतं. स्क्रिनिंगसाठी अभिनेता सलमान खान देखील उपस्थित होता. सध्या सोशल मीडियावर सलमान खान याचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नुकताच समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये भाईजान चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. सलमान खानचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
अभिनेत्याच्या व्हिडीओवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘बचपन का प्यार अब बूढ़ा हो रहा है…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘आपला आवडता अभिनेता आता वृद्ध होतोय…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘बॉलिवूडची जान सलमान खान…’, चौथा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘तो का वृद्ध होईल, सलमान जगातील हँडसम अभिनेता आहे…’ सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त सलमान खान याच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
स्क्रिनिंग दरम्यान सलमान खान याला सतीश कौशिक यांच्याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा भाईजान म्हणाला, ‘सतीश कौशिक माझ्या प्रचंड क्लोज होते. त्यांच्याबद्दल सर्वांत मोठी गोष्ट सांगायची झाली तर, त्यांनी निधनापूर्वी सर्व सिनेमांची शुटिंग पूर्ण केली. ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमात देखील सतीश होते…’ असं म्हणत सलमान खान भावूक झाला.
सलमान खान आणि सतीश कौशिक यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाशिवाय दोघांनी ‘दुल्हन हम ले जाएंगे’, ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’ ‘भारत’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. सतिश कौशिक यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती.
सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील अभिनेता ‘पटना शुक्ला’ सिनेमाच्या स्क्रिनिंगमुळे चर्चेत आला आहे. सलमान खान याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. चाहते आजही अभिनेत्याच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात.