फूटपाथवर झोपलेल्या व्यक्तींना चिरडल्यापासून ऐश्वर्या मारहाण प्रकरण, सलमान खान वादाच्या भोवऱ्यात

| Updated on: Nov 05, 2024 | 12:15 PM

Salman Khan Controversies: काळवीट शिकार प्रकरण ते फूटपाथवर झोपलेल्या व्यक्तींना चिरडल्याचे आरोप...., अनेक प्रकरणांमुळे सलमान खान वादाच्या भोवऱ्यात..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान आणि त्याच्या वादग्रस्त प्रकरणांची चर्चा...

फूटपाथवर झोपलेल्या व्यक्तींना चिरडल्यापासून ऐश्वर्या मारहाण प्रकरण, सलमान खान वादाच्या भोवऱ्यात
salman khan
Follow us on

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे अभिनेता सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, साता समुद्रापार देखील आहे. सलमान याने अनेक भूमिका बजावत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण अनेक प्रकरणांमुळे अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला. आता देखील गुंड लॉरेन्स बिश्नोई याच्या निशाण्यावर सलमान खान आहे. तर जाणून घेऊ सलमान खान याच्या आयुष्यातील वादग्रस्त प्रकरणं…

एक्स-गर्लफ्रेंड सोमी अलीने केले गंभीर आरोप

सोमी अली हिने सलमान खानवर गंभीर आरोप केले. 1991 – 1999 पर्यंत दोघे एकत्र होते. पण अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर सोमी हिने सलमान याच्यावर शाब्दिक आणि शारीरिक शोषणाचा आरोप केले. त्यामुळे तिने नो मोअर टीयर्स ही संस्था स्थापन केली. आता देखील सोमी सलमान बद्दल मोठे खुलासे करत असते.

काळवीट शिकार प्रकरण

1999 मध्ये जोधपूरमध्ये शूटिंगदरम्यान सलमान खान आणि त्याच्या सहकलाकारांवर ‘हम साथ साथ है’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान काळ्या हरणाची शिकार केल्याचा आरोप होता. ज्यामुळे सलमान आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या घटनेमुळे लॉरेन्स बिश्नोई संतप्त झाला आणि त्याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

फूटपाथवर झोपलेल्या व्यक्तींना चिरडल्याचे आरोप

सलमान खानला 28 सप्टेंबर 2002 रोजी निष्काळजीपणे ड्राईव्ह केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याची कार मुंबईतील एका बेकरीला धडकली. या अपघातात बेकरीबाहेरील फूटपाथवर झोपलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता तर तीन जण जखमी झाले होते.

सलमान खान – ऐश्वर्या राय यांच्यातील वाद

सलमान खान – ऐश्वर्या राय यांनी दोन वर्ष एकमेंकांना डेट केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. ऐश्वर्या हिने सलमानवर गंभीर आरोप केले होते. ऐश्वर्या म्हणाली होती, ‘सलमानचं दारूचं व्यसन, शारीरिक अत्याचार आणि अपमानाला कंटाळली होती. असे असूनही मी त्याच्यासोबत होती. त्या बदल्यात मला फक्त दु:ख आणि वेदना मिळाल्या. या प्रकरणातील माझ्या मौनाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. माझ्याबद्दल नको त्या चर्चा रंगू लागल्या… सलमानमुळे माझ्या को-स्टारसोबत असलेल्या नात्याला देखील तडा गेला… ‘ असं ऐश्वर्या म्हणाली होती.

सलमान खान विरोधात विवेक ओबेरॉय याचं वक्तव्य

1 एप्रिल 2003 मध्ये विवेक याने पत्रकार परिषदेत दावा केला होता. सलमान खान याने फोन करून धमकावल्याचा दावा विवेक याने केला होता. सांगायचं झालं तर, तेव्हा ऐश्वर्या राय आणि विवेक एकमेकांना डेट करत होते.

शाहरुख खान सोबत वाद…

2008 साली कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीत सलमानचं शाहरुख खानसोबत भांडण झालं होतं. तेव्हापासून दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू होतं. शाहरुख खानने एक विनोद केला होता जो सलमानला आवडला नाही… म्हणून दोघांमध्ये वाद झाले. असं अनेकदा समोर आलं.