Salman Khan | ‘करियर उद्ध्वस्त करण्याची ताकद…’, सलमान खानच्या एक्स-गर्लफ्रेंडचं धक्कादायक वक्तव्य

| Updated on: Jul 11, 2023 | 3:36 PM

सलमान खान याच्या एक्स - गर्लफ्रेंडने फक्त भाईजान याच्यावरच नाहीतर, बॉलिवूडच्या आणखी एका सेलिब्रिटीवर साधलाय निशाणा...

Salman Khan | करियर उद्ध्वस्त करण्याची ताकद..., सलमान खानच्या एक्स-गर्लफ्रेंडचं धक्कादायक वक्तव्य
Follow us on

मुंबई | अभिनेता सलमान खान याची एक्स – गर्लफ्रेंड सोनी अली कायम तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता देखील सोनीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर करत थेट सलमान खान याच्यावर निशाना साधला आहे. सोमीने यावेळी एका वाईट नात्याबद्दल सांगत मनातील खंत व्यक्त केली आहे. यावेळी सोमी हिने फक्त सलमान खान याच्यावर नाही तर, बॉलिवूडच्या आणखी एका सुपरस्टावर निशाणा साधला आहे. सोमीने पोस्टमध्ये त्या अभिनेत्याला उल्लेख किंग ऑफ बॉलिवूड असा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

सोमी म्हणाली, ‘मला ही पोस्ट डीलीट करण्यासाठी सांगण्यात येईल. माझ्यावर अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जावू शकतात. माझ्या मद्यपानाच्या समस्येबद्दल देखील अनेक चर्चा रंगतील. पण तरी देखील मी मागे हटणार नाही. कारण तुम्ही इतका अपमान, सर्व प्रकारच्या यातना आणि शिवीगाळ सहन केलेली नाही. मला कोणीही पाठिंबा दिला नाही कारण ज्याने  अपमान केला तो मोठा स्टार आहे आणि तुम्ही त्याचे मित्र आहात.’

 

 

‘तो अनेकांचं करियर बनवू शकतो, तर अनेकांनी उद्ध्वस्त करण्याची ताकद देखील त्याच्यामध्ये आहे. याठिकाणी मला एका चांगल्या व्यक्तीबद्दल बोलायचं आहे. जो गैरवर्तन करतो, बॉलिवूडचा किंग त्याला ‘प्यारा इंसान’ म्हणत आहे. बॉलिवूडच्या ज्या व्यक्तीबद्दल मी आता बोलत आहे, त्याच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. पण तो कोणत्या बंधनात आहे, हे देखील माला ठावूक आहे.’

पुढे सोमी अली म्हणाली, ‘तरीही स्त्रियांबद्दल इतका आदर असलेला हा सुपरस्टार आजही अशा व्यक्तीच्यासोबत आहे, जो कायम गैरवर्तन करतो, हे खेदजनक आणि विडंबनात्मक आहे. कोणत्याही अडथळ्यांना माझी भूमिका घेण्याच्या क्षमतेमध्ये अडथळा आणू देणार नाही, महत्त्वाचं म्हणजे त्याला स्वतःला एक मुलगी आहे. एवढंच नाही तर जेव्हा त्याच्या मुलावर ड्रग्सचे आरोप लावले होते तेव्हा मी त्याच्यासाठी आवाज उठवला होता…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. शिवाय पोस्टमध्ये अभिनेत्रीने सलमान खान याला टॅग देखील केलं आहे.

सोमी अली कायम एक्स बॉयफ्रेंड सलमान खान याच्यावर आरोप करत असते. सोशल मीडियावर देखील सलमानच्या विरोधात सोमी पोस्ट करते. सोशल मीडियावर सोमीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सोमी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.