‘बिग बॉस ओटीटी 3’ शो संपला आहे. शो संपून एक आठवडा पूर्ण झाला आहे. आता ‘बिग बॉस 18’ शोच्या चर्चा जोर धरु लागल्या आहे. अभिनेता समान खान याच्या शोची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे. छोट्या पडद्यावरील वादग्रस्त ‘बिग बॉस’ शो प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडत्यात सुरु होतो. अशात ‘बिग बॉस 18’ शोची चर्चा गेल्या काही दिवसांपासून तुफान रंगत आहे. ‘बिग बॉस 18’ शोमध्ये स्पर्धक कोण असतील? असा प्रश्न देखील चाहते विचारत आहेत.
सांगायचं झालं तर, शो सुरु होण्याआधी ‘बिग बॉस’च्या घरात कोण स्पर्धक म्हणून प्रवेश करणार? स्पर्धकांची नावे समोर येतात. पण निर्माते, स्पर्धक कधीच सुरुवातीला स्वतःच्या नावाचा खुलासा करत नाही. पण ‘बिग बॉस 18’ शोच्या स्पर्धकांची नावे समोर आलीत आहेत. या यादीत एका अभिनेत्रीचं नाव आहे, जे अत्यंत हैराण करणारं आहे.
सध्या ज्या नावाची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री सोमी अली आहे. एक काळ असा होता जेव्हा सलमान खान आणि सोमी अली यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी सर्वत्र जोर धरला होता. पण नातं फार काळ टिकलं नाही. आता अनेक वर्षांनंतर सोमी अली आणि सलमान खान एकमेकांसमोर ‘बिग बॉस 18’ शोच्या माध्यमातून येतील अशी चर्चा रंगली आहे. पण यावर अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
एक काळ होता जेव्हा सोमी अली, सलमान खान याची गर्लफ्रेंड होती. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. सोमीने सलमानवर अनेक गंभीर आरोप केलं. सलमानवर फसवणुकीचे आणि सतत मारहाण करण्याचे आरोप अभिनेत्रीने केले. पण सलमान खान याने कधीच यावर वक्तव्य केलं नाही. अशात सलमानच्या शोमध्ये सोमी येणार की नाही? यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे.
रिपोर्टनुसार, सलमान – सोमी यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं. ‘बुलंद’ सिनेमात दोघांनी एकत्र काम देखील केलं. 1999 मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं. सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर सोमीने भारत सोडून निघून गेली. एका मुलाखतीत, सोमी हिने ‘ऐश्वर्या राय हिच्यामुळे माझं आणि सलमानचं ब्रेकअप झालं…’ असं म्हणाली होती. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोमी अलीची चर्चा रंगली आहे.