अभिनेता सलमान खान गेल्या काही दिवसांपासून कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. खास मित्र आणि ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान याच्या जीवाला देखील धोका असल्याचं सागितलं जात आहे. गुंड लॉरेन्स बिश्नोई सतत अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी देत आहे. सांगायचं झालं तर, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आणि अभिनेत्याने ‘बिग बॉस 18’ शोचं शुटिंग देखील रद्द केलं. पण आता सलमान याने दिलेला शब्द पाळला आहे. मोठ्या सुरक्षेत सलमान खान याने ‘विकेंड का वार’चं शुटिंग पूर्ण केलं. शुट दरम्यान अभिनेता भावुक देखील झाला.
सध्या सोशल मीडियावर सलमान खान याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सलमान स्पर्धक शिल्पा शिरोडकर हिच्यासोबत बोलताना दिसत आहे. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवायला शिक… असं सलमान शिल्पाला सांगताना दिसत आहे.
सांगायचं झालं तर, शिल्पाने अविनाश मिश्रा याला कंटाळून खाणं बंद केलं होतं. शिल्पा, सलमान खान समोर रडते देखील. तेव्हा सलमान म्हणतो, ‘तुझी मुलगी अन्नावर राग व्यक्त करेल तेव्हा तू काय करशील?’ यावर शिल्पा म्हणते, ‘मला अविनाशचा राग नाही तर, त्याच्या वगणुकीवर मी नाराज आहे…’
पुढे सलमान खान म्हणतो, ‘या घरात भावनां कोणतीत किंमत नाही. याठिकाणी मला आज यायचं नव्हतं. पण कमिटमेंट असते. त्यामुळे मी आज याठिकाणी आहे. माझं एक काम आहे आणि ते काम करण्यासाठी मी येथे आलो आहे. मला कोणासोबत भेटायचं नाही. मला तुमच्यासोबत देखील मला बोलायचं नाही…’ असं देखील भाईजान म्हणाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कडक सुरक्षा व्यवस्थेत सलमान खान याने शुटिंग सुरु केली. सलमानच्या सुरक्षेसाठी सेटभोवती 60 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सेटवर कोणालाही प्रवेश नव्हता.
सांगायचं झालं गेल्या अनेक महिन्यांपासून सलमान खान याला जीवेमारण्याच्या धमक्या मिळत आहे. अभिनेता आणि बॉलिवूडमध्ये दबाव निर्माण करण्यासाठी अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबार देखील करण्यात आहे. त्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सर्वत्र खळबळ माजली. या सर्व धक्कादायक घटनांची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई याने घेतली आहे.