अभिनेता सलमान खान याचे वडील सलीम खान आज बॉलिवूडच्या प्रसि द्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहेत. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी सलीम खान यांनी प्रचंड मेहनत घेतली. कॉलेजमध्ये असताना सिनेमात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. अनेक सिनेमांमध्ये काम केल्यानंतर अनेक जाहिरातींमध्ये सलीम खान झळकले. त्यानंतर त्यांना कळलं अभिनयात आपल्याला यश मिळणार नाही. त्यामुळे सलीम खान यांनी लेखणाकडे मोर्चा वळवला आणि ‘शोले’ यांसारखे अनेक सिनेमांसाठी लेखण केलं.
सलीम खान यांच्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता सलमान खान बॉलिवूडवर राज्य करत आहे. सांगायचं झालं तर, सलीम खान कायम त्यांच्या कुटुंबाबद्दल आणि तीन मुलांबद्दल चाहत्यांना सांगत असतात. शिवाय मुलांच्या वाईट सवयींबद्दल बोलताना देखील सलीम खान मागे पाहात नाहीत.
‘जोपर्यंत मुलं माझी इज्जत करतात, तोपर्यंत त्यांचा वडील आहे…’ असं देखील सलीन खान एका मुलाखतीत म्हणाले होते. एका मुलाखतीत सलीम खान यांनी किस्सा सांगितला होता. सलीम खान म्हणाले होते, ‘एकदा ईदसाठी नमाज पठण्यासाठी मस्जिदमध्ये जात होते. बिल्डिंग खाली आलो मला ड्रायव्हर दिसला नाही. त्यामुळे रिक्षा केली आणि गेलो. रिक्षा वाल्याला मस्जिद बाहेर थांबवलं होतं. कारण परत त्याच रिक्षाने घरी जाणार होतो.’
‘रिक्षा वाल्याने मला घरी सोडलं आणि त्याने मला विचारलं येथे सलमान खान राहातो ना? मी हो म्हणालो… काही सेकंद विचार केल्यानंतर त्याने मला विचारलं तुम्ही सलमान खानचे वडील आहात ना? मी म्हणालो, ‘हो मी सलमान खानचा वडील आहे… पण जोपर्यंत तो माझी इज्जत करत आहे तोपर्यंत… असं बोललो तेव्हा रिक्षावाला देखील हसू लागला…’ असं सलीम खान म्हणाले होते.
सांगायचं झालं तर, सलीम खान यांना तीन मुलं आहेत. सलमान खान, अरबाज खान आणि सोहैल खान… आज तिन्ही भाऊ बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटी आहेत. सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, सात समुद्रापार देखील फार मोठी आहे. चाहते कायम सलमान खान याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.