अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील अभिनेता एका मोठ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. नुकताच, मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात सलमान खान उपस्थित राहिला होता. कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. कार्यक्रमात सलमान खान याने गणेशोत्सवाबद्दल अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या. ज्यावर नेटकरी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत. सध्य सलमान खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नुकताच झालेल्या कार्यक्रामात सलमान खान याने सर्वांना इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यास सांगितलं आहे. भाईजान म्हणाला, ‘किती खराब वाटतं… पीओपी आणि इत्यादी गोष्टींनी घडलेल्या गणपतीची आपण स्थापना करतो. गणरायाचं विसर्जन करतो तेव्हा त्याचे पाय, मान, सोंड, हात सगळीकडे पसरलेले असतात… त्यामुळे सर्वांनी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करायला हवा…’ असं वक्तव्य सलमान खान याने नुकताच झालेल्या केलं आहे.
सलमान खानच्या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी म्हणाले, ‘भाईने बोला करने का तो करने का…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सलमान खान माझ्या मनातील गोष्ट बोलला आहे…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘हा प्रत्येक वर्षी स्वतःच्या घरी गणपती आणतो. मुस्लीम असून देखील गणेशोत्सव साजरा करतो.’ तर अनेकांनी सलमान खान याला ट्रोल देखील केलं आहे.
सांगायचं झालं तर, सलमान खान दरवर्षी स्वतःच्या घरात गणरायाची स्थापणा करतो. गणपती निमित्त अभिनेत्याच्या घरात अनेक सेलिब्रिटी देखील दर्शनासाठी येत असतात. सलमान खान स्वतः मनोभावे गणरायाची पूजा करतो. भाईजानच्या घरातील गणेशोत्सवाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.
समलान खान याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेता कायम सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतो.
आता सलमान खान लवकरच ‘सिकंदर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. चाहते देखील पुन्हा अभिनेत्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही.