ऐश्वर्या सोबतचे गाणे ऐकून सलमान खान झाला भावूक, व्हिडिओ होतोय व्हायरल

| Updated on: Mar 08, 2024 | 10:38 AM

सलमान खान आणि ऐश्वर्या राय ही जोडी बॉलिवूडमध्ये अनेक वर्ष चाहत्यांसाठी फेव्हरेट जोडी होती. दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. पण काही वर्षातच दोघांचा ब्रेकअप झाला. आज इतक्या वर्षानंतर ही दोघांच्या नावाची चाहत्यांमध्ये चर्चा असते. दोघे नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात.

ऐश्वर्या सोबतचे गाणे ऐकून सलमान खान झाला भावूक, व्हिडिओ होतोय व्हायरल
Follow us on

Salman Aishwarya : बॉलीवूड अभिनेता सलमान खान नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. अलीकडेच तो जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये उपस्थित होता. यावेळी त्याने अभिनेता शाहरुख खान आणि आमिर खानसोबत डान्स देखील केला. लवकरच त्याचा नवा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ‘द बुल’ असे या चित्रपटाचे नाव आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये या सिनेमाबाबत बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे.

सलमान खान आणि ऐश्वर्या रॉय यांची जोडी एकेकाळी चाहत्यांची फेव्हरेट जोडी होती. आज देखील दोघांची चर्चा होते. पण सोशल मीडियावर सलमानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो भावूक झाला आहे. कारण समोरची व्यक्ती त्यांचं आणि ऐश्वर्या रॉयचे गाणे गात आहे.

व्हायरल व्हिडिओचे सत्य

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ बराच जुना आहे. ‘सा रे ग मा पा’ या सिंगिंग रिॲलिटी शोच्या एका एपिसोडची ही छोटी क्लिपिंग आहे. या व्हिडिओमध्ये एक स्पर्धक सलमान आणि ऐश्वर्या राय यांचं ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील गाणे गाताना दिसत आहे. ज्यावर तो भावूक झालेला दिसत आहे.

‘तडप- तडप के इस दिल से आ निकले लागी’ हे गाणे गात असताना सलमान खानला देखील ते फील होत आहे. त्याच्या डोळ्यातून अश्रू देखील आले. या गाण्यात सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकत्र दिसले होते. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ यूट्यूबवर खूप पूर्वी अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ४० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

का झाले होते ब्रेकअप

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खान आणि ऐश्वर्या राय 1990 मध्ये रिलेशनशिपमध्ये आले होते. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यातील संबंध 2 वर्ष चांगले होते. पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. तेव्हापासून या जोडीने मोठ्या पडद्यावर पुन्हा कधीच एकत्र काम केले नाही. 20 एप्रिल 2007 रोजी ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. अभिषेक बच्चन वयाने ऐश्वर्या रायपेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. या जोडप्याला आराध्या बच्चन नावाची मुलगी आहे.