सध्या हिरामंडी या वेब सीरीजची जोरदार चर्चा आहे. या वेब सीरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींचं कौतूक होत आहे. या वेब सीरीजमध्ये काम करणारी शर्मीन सहगल सध्या खूप ट्रेंड करत आहे. या वेब सीरीजमध्ये तिने आलमजेबची भूमिका साराकली आहे. दरम्यान, ETimes ला दिलेल्या मुलाखतीत तिने खुलासा केला की, बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने तिला एकदा लग्नासाठी प्रपोज केले होते. एक जुनी आठवण सांगत असताना अभिनेत्रीने गमतीने सांगितले की, ती जेव्हा दोन वर्षांची होती तेव्हा सुपरस्टार सलमान खानने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. त्यावर तिने नाही असं उत्तर दिले होते. ती म्हणाली की, मी 2 किंवा 3 वर्षांचा असेल. तेव्हा सलमानने विचारले की तू माझ्याशी लग्न करशील का? आणि मी नाही असे उत्तर दिले होते.
शर्मीन नुकतीच नेटफ्लिक्स शो द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये हिरामंडीच्या कलाकारांसह दिसली होती. संजय लीला भन्साळी यांची ती भाची आहे. असं असताना ही आलमजेबच्या भूमिकेसाठी तिला 16 वेळा तिला ऑडिशन द्यावे लागले. कपिल शर्मा म्हणाला की, त्याने खरंच तुझं ऑडिशन दिलं का की तू त्याला काका बनवलंस? यावर अभिनेत्री म्हणाली, तिने एक वर्ष यासाठी तयारी केली आणि 16 वेळा ऑडिशन दिले होते.
शर्मीनने लुक टेस्टचे फोटो शेअर केले होते, ज्यात तिने लिहिले होते, “आलमजेब लुक टेस्ट” आणि काही इमोजी देखील शेअर केले. काही दिवसांपूर्वी शर्मीन सहगलला तिच्या “एक्स्प्रेशनलेस” अभिनयामुळे खूप ट्रोल करण्यात आले होते, ज्यामुळे शर्मीनने तिच्या एका पोस्टमध्ये इन्स्टाग्राम कमेंट्स बंद केल्या होत्या, ज्यामुळे ती चर्चेत आली होती.
बॉलिवूडचा दबंग सलमान खान याने अजूनही लग्न केलेले नाही. पण त्याचे नाव बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. ज्यामध्ये ऐश्वर्या राय, कॅटरिना कैफ, लूलिया वंतूर यांच्यासोबत जोडले गेले.