मुंबई : बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान हा कायमच चर्चेत असतो. सलमान खान याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आज सलमान खान याचा 58 वा वाढदिवस आहे. सकाळपासूनच सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सलमान खान याला वाढदिवसाच्या शुभेच्छा या दिल्या जात आहेत. सलमान खान याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट केले आहेत. सलमान खान कोट्यवधी संपत्तीचा मालक देखील आहे.
सलमान खान याने चित्रपटांमध्ये येण्याच्या अगोदरच ठरवले होते की, तो चित्रपटांमध्ये कधीच लिपलॉक करणार नाहीये. त्याचे कारणही स्वत: सलमान खान यानेच सांगितले. मुळात म्हणजे जेंव्हाही चित्रपटामध्ये सलमान खान याचा लिपलॉकचा सीन येतो त्यावेळी कॅमेऱ्याचा अँगल चेंज केला जातो आणि सलमान लिपलॉक करत नाही.
सलमान खान याने त्याच्या करिअरमध्ये कधीच चित्रपटामध्ये लिपलॉक केले नाहीये. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये सलमान खान हा याबद्दल थेट बोलताना दिसला. सलमान खान म्हणाला की, मी लहान असताना घरी सर्वजण मिळून इंग्रजी चित्रपट बघत असत. मात्र, बऱ्याच वेळा ज्यावेळी चित्रपटामध्ये किसिंगचा सीन येतो, त्यावेळी सर्वजण अवघडायचे.
इंग्रजी चित्रपटातील किसिंग सीनच्या वेळी जी परिस्थिती घरातील सदस्यांची असायची तशी माझ्या चाहत्यांची होऊ नये आणि त्यांना चित्रपट घरातील सर्व सदस्यांसोबत मिळून बघता यावा, यासाठी मी चित्रपटात किसिंग सीन न करण्याचे ठरवले. माझा चित्रपट घरातील सर्वच सदस्यांना एकसोबत बसून बघता यावा ही माझी इच्छा असते. कोणालाही अवघडलेल्यासारखे वाटू नये.
मी या काही गोष्टी फाॅलो करतो यामुळे माझे चाहते हे माझ्यासोबत आजही जोडलेले आहेत आणि ते माझ्यावर प्रेम करतात. असे बरेच चित्रपट असतात जे तुम्ही तुमच्या कुटुंबियासोबत पाहू शकत नाहीत. तुम्ही ते चित्रपट फक्त तुमच्या मित्रांसोबत किंवा एकटे बघू शकतात. तशा चित्रपटांमध्ये काम नाही करायचे हे मी ठरवे आहे.
मैंने प्यार किया या चित्रटामध्ये भाग्यश्रीसोबत सलमानचा किसिंग सीन होता. राधेमध्ये दिशा पटानीसोबत देखील किसिंग सीन होता. मात्र, यावेळी दिशा हिच्या तोंडावर टेप लावण्यात आला होता. 35 वर्षांपासून सलमान खान हा नो किसिंग सीनची पाॅलिशी ही फाॅलो केली आहे. याचाच खुलासा सलमान खान याच्याकडून करण्यात आला.