मुंबई : बिग बॉस सीजन 17 धमाका करताना दिसत आहे. आज बिग बॉस 17 मध्ये विकेंडचा वार पार पडणार आहे. यावेळी सलमान खान हा घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास लावताना दिसणार. सध्या सोशल मीडियावर एक प्रोमो तूफान व्हायरल होताना दिसतोय. या प्रोमोमध्ये सलमान खान याच्या निशाण्यावर अंकिता लोखंडे हिचा पती विकी जैन आणि मुनव्वर फारुकी हे दिसत आहेत. इतकेच नाही तर विकी जैन याला सलमान खान हा थेट म्हणतो की, विकी भाई हा सर्वात जास्त फट्टू गेम खेळत आहे. यावेळी विकी जैन हा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो. मात्र, सलमान खान त्याला पुढे काही बोलू देत नाही.
सलमान खान हा विकी जैन याला थेट म्हणतो की, विकी माझे म्हणणे ऐकून घे…सलमान खान याला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करताना विकी जैन हा दिसतोय. दुसरीकडे मुनव्वर फारुकी याला देखील सलमान खान म्हणतो की, तुला वाटत असेल की तू खूप चांगला गेम खेळत आहेस. मात्र, असे अजिबातच नाहीये तुला यामध्ये काय मजा येत आहे.
मुनव्वर फारुकी आणि विकी जैन यांनी एक गेम प्लॅन तयार केला असून ते घरातील सदस्यांना त्यांच्या तालावर नाचवत आहेत. हेच नाही तर विकी जैन हा नाॅमिनेशनपासून वाचण्यासाठी हे सर्व करत आहे. विशेष म्हणजे विकी जैन आणि मुनव्वर फारुकी यांचे एकही नाते घरातील खरे नाहीये. ते फक्त गेमसाठी हे करत आहेत.
थोडक्यात काय तर सलमान खान याने विकी जैन आणि मुनव्वर फारुकी यांचा खरा चेहरा घरातील सदस्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी मुनव्वर फारुकी हा देखील सलमान खान याला समजून सांगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आता हाच प्रोमोचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. चाहते यावर प्रतिक्रिया या देताना दिसत आहेत.
नुकताच बिग बॉस सीजन 17 च्या निर्मात्यांनी घरातील सदस्यांना एक राशनचा टास्क दिला. यावेळी घरात मोठा हंगामा होताना दिसला. आता बिग बॉस सीजन 17 मध्ये काही नवीन सदस्य हे दाखल होताना दिसत आहेत. बिग बॉस सीजन 17 ला अजूनही टीआरपीमध्ये म्हणावा तसा काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाहीये. यामुळेच निर्मात्यांनी मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.