IND vs PAK | टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी सलमान खान थेट स्टेडियममध्ये, अभिनेत्याने केले मोठे भाष्य

| Updated on: Oct 14, 2023 | 6:54 PM

सलमान खान हा त्याच्या आगामी टायगर 3 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसतोय. टायगर 3 चित्रपटात सलमान खान याच्यासोबत कतरिना कैफ ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ नक्कीच आहे.

IND vs PAK | टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी सलमान खान थेट स्टेडियममध्ये, अभिनेत्याने केले मोठे भाष्य
Follow us on

मुंबई : भारत आणि पाकिस्तामधील सामना रंगताना दिसतोय. या सामन्यावर सर्वांचाच नजरा आहेत. विशेष म्हणजे हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) पार पडतोय. भारतीय संघ आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये एकदाही पाकिस्तान संघाकडून पराभूत झालेला नाहीये. आपल्या टिमला सपोर्ट (Support) करण्यासाठी प्रेक्षक हे अहमदाबादच्या दिशेने रवाना कालपासूनच होताना दिसले. भारताचे क्रिकेटर धमाका करताना गेल्या काही दिवसांपासून दिसत आहेत.

विशेष म्हणजे बाॅलिवूड कलाकारांमध्येही या सामन्याबद्दल मोठे क्रेझ हे बघायला मिळतंय. अनेक कलाकार भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी थेट नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहचले. विशेष म्हणजे हा सामन्या बघण्यासाठी बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सर्वांचा आवडता अभिनेता सलमान खान हा देखील पोहचलाय.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर बरेच बाॅलिवूड कलाकार पोहचले आहेत. सलमान खान याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये सलमान खान याने भारतीय संघाला मोठा मंत्र विजयासाठी दिल्याचे दिसतंय. सलमान खान म्हणाला की, स्टेडियमच्या बाहेर मारा, पूर्ण आत्मविश्वासाने खेळा.

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्या मॅचबद्दल ज्याप्रमाणे लोकांमध्ये उत्साह आहे आणि स्टेडियम हाऊसफुल्ल आहे, त्याचप्रमाणे टायगर 3 देखील हाऊसफुल्ल असेल. सलमानने स्टुडिओमधून चाहत्यांना हा संदेश दिला आहे की, पहिल्या दोन चित्रपटांपेक्षा ‘टायगर 3’मध्ये 10 पट जास्त अॅक्शन असेल. यावेळी हरभजन सिंह देखील स्टुडिओमध्ये उपस्थित दिसतोय.

सलमान खान हा त्याच्या आगामी टायगर 3 चित्रपटामुळे सध्या जोरदार चर्चेत आहे. टायगर 3 चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी एक क्रेझ बघायला मिळतंय. टायगर 3 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सलमान खान हा दिसत आहे. सलमान खान याच्या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ ही देखील धमाका करताना दिसणार. विशेष म्हणजे या दोघांना एकसोबत पाहण्यास चाहते आतुरत आहेत.