सलमान घाबरलाच पाहिजे..; गोळीबार करणाऱ्यांना अनमोल बिष्णोईकडून संदेश

| Updated on: Jul 27, 2024 | 5:18 PM

याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. विकी गुप्ता आणि सागर पाल यांना गुजरातमधून अटक करण्यात आली. तर अनुज थापन आणि आणखी एका व्यक्तीला पंजाबमधून ताब्यात घेण्यात आलं होतं. यापैकी अनुजने पोलीस कोठडीतच आत्महत्या केली.

सलमान घाबरलाच पाहिजे..; गोळीबार करणाऱ्यांना अनमोल बिष्णोईकडून संदेश
सलमान खान आणि शूटर्स
Image Credit source: ANI
Follow us on

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने चार्जशीट दाखल केली. अनमोल बिष्णोईने विकी गुप्ता आणि सागर पाल या दोन शूटर्ससमोर प्रेरक भाष्य दिल्याचा उल्लेख या चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. “तुम्ही तुमचं काम नीट करा कारण त्याची इतिहासात नोंद होणार आहे”, असं तो शूटर्सना म्हणाला. अनमोल बिष्णोई हा तुरुंगात असलेला आरोपी लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ आहे. सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या शूटर्सना त्याने नऊ मिनिटांचं भाषण दिल्याचा उल्लेख पोलिसांनी चार्जशीटमध्ये केला आहे. एप्रिल महिन्यात वांद्रे इथल्या सलमानच्या ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटबाहेर पहाटेच्या सुमारास दोघांनी गोळीबार केला होता. सुदैवाने या गोळीबारात कोणालाही दुखापत झाली नव्हती.

अनमोल बिष्णोईचं शूटर्सना भाषण

“हे काम नीट करा. हे काम संपल्यावर तुम्ही इतिहास घडवणार आहात”, असं अनमोल शूटर्सला म्हणाल्याचं चार्जशीटमध्ये लिहिलं आहे. पोलिसांनी 1735 पानांचा चार्जशीट दाखल केला आहे. अनमोलने ऑडिओ मेसेजच्या रुपात शूटर्सना हा संदेश दिला होता. त्यात त्याने म्हटलंय, “हे काम करताना तुम्ही अजिबात घाबरू नका. हे काम करणं म्हणजे समाजात बदल घडवून आणणं आहे. तुम्ही अशा पद्धतीने गोळीबार करा की सलमान खान घाबरला पाहिजे.” चार्जशीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, शूटर्सना गोळीबार करताना हेल्मेट न घालण्याचेही आदेश देण्यात आले होते.

सलमानकडून निराशा व्यक्त

मुंबई क्राइम या गोळीबारप्रकरणी सलमान आणि त्याचा भाऊ अरबाज खान यांचा जबाब नोंदवला होता. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, गँगस्टर्सकडून सतत निशाण्यावर असल्याने सलमानने पोलिसांसमोर जबाब नोंदवताना हताश होऊन निराशा व्यक्त केली होती. ज्या गुन्ह्यासाठी मी आधीच खूप त्रास सहन केला आणि विविध न्यायालयांमध्ये दंड भरला आहे, असा दावा करत त्यावरून सतत लक्ष्य केल्याप्रकरणी सलमानने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावेळी पोलिसांनी सलमानची तीन तास आणि अरबाजची दोन तास चौकशी केली होती.

हे सुद्धा वाचा

लॉरेन्स बिष्णोईच्या भावाने या गोळीबाराची जबाबदारी घेतली होती. 1998 मध्ये ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जोधपूरजवळ काळवीट शिकार केल्याचा आरोप सलमानवर आहे. या शिकार प्रकरणापासून सलमानला सतत बिष्णोई गँगपासून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.