तीन महिने सोबत राहातात त्यानंतर…, सलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीला नाही प्रेमावर विश्वास, म्हणाली…

| Updated on: Jun 14, 2024 | 3:20 PM

सलमान खानची 'ही' अभिनेत्री रिलेशनशिप, लग्नाबद्दल म्हणते, 'तीन महिने सोबत राहातात त्यानंतर...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तिने केलेल्या वक्तव्याची चर्चा..., झगमगत्या विश्वात सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे चर्चा...

तीन महिने सोबत राहातात त्यानंतर..., सलमान खानच्या या अभिनेत्रीला नाही प्रेमावर विश्वास, म्हणाली...
Follow us on

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या गर्लफ्रेंड – बॉयफ्रेंडसोबत लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. पण काही सेलिब्रिटी असे देखील आहेत, ज्यांनी लग्नासाठी स्पष्ट नकार दिला आहे. तर काहींना आयुष्यात शेवटपर्यंत टिकेल असं प्रेम हवं आहे. सध्या एका अभिनेत्रीने देखील लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री झरीन खान हिने लग्न आणि रिलेशनशिपबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. वयाच्या 37 व्या वर्षी देखील अभिनेत्री एकटीच आहे. अद्याप लग्नासाठी तयार नाही… असं देखील अभिनेत्री म्हणाली.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री झरीन खान म्हणाली, ‘लग्न करण्याच्या शर्यतीत मी नाही. ज्या प्रकारे सेलिब्रिटी लग्न करत आहेत. माहिती नाही ते खरंच लग्न करत आहेत, की त्यांच्यावर कोणता दबाव आहे. मी एकमेकांच्या सहवासावर विश्वास ठेवते. आजच्या दिवसांमध्ये तीन महिने एकत्र राहातात. त्यानंतर भांडणं होतात आणि नाती तुटतात… ‘

‘तीन महिन्यांमध्ये तुटणाऱ्या नात्यांवर माझा विश्वास नाही. मला पूर्ण आयुष्य नातं निभवायचं आहे. आयुष्यभर टिकणाऱ्या प्रेमावर माझा विश्वास आहे. जसं प्रेम आपल्या आजी – आजोबा यांच्यामध्ये होतं. त्यांच्यामध्ये प्रेम होतं. भांडणं त्यांच्यामध्ये देखील व्हायची पण तरी देखील एकमेकांचा साथ आजी – आजोबांनी सोडली नाही… कधी नातं संपवलं नाही. आता लोकांमध्ये संयम नाही… ‘

हे सुद्धा वाचा

‘आताच्या जगात कोणाला रिलेशनशिप टिकवण्यासाठी कष्ट घ्यायचे नाहीत. लोकांच्या आयुष्यात आता अनेक अडचणी आहेत, तणाव आहे… त्यामुळे रिलेशनशिपला कोणी प्राधान्य देत नाही. मला पूर्वीप्रमाणे प्रेम टिकवणारा, नातं जपणारा भेटत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही…’ असं देखील झरीन खान म्हणाली.

झरीन खान हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता सलमान खान स्टारर ‘वीर’ सिनेमातून झरीन हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर झरीन हिने ‘अक्सर 2’, ‘हेट स्टोरी 4’, ‘1921’, ‘वजह तुम हो’, ‘हेट स्टोरी 3’, ‘हाउसफुल 3’ आणि ‘हम भी अकेले तुम भी अकेले’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली.

अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटींसोबत स्क्रिन शेअर केल्यानंतर देखील अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये हवं तसं यश मिळालं नाही. पण झरीन सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.