अभिनेता सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाहीतर, भारत देशाबाहेर देखील फार मोठी आहे. त्यामुळे अभिनेत्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. तेव्हापासून अभिनेत्याला फार कमी स्पॉट करण्यात येतं. आता सलमान खान याच्या लोकेशनबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.
सलमान खान सध्या लंडन याठिकाणी आहे. भाईजान याने लंडन येथील ब्रेंट नॉर्थचे खासदार बॅरी गार्डिनर यांची भेट घेतली. बॅरी गार्डनर यांनी देखील लंडनमध्ये सलमान खानचे स्वागत केलं. बॅरी गार्डिनर यांनी सोशल मीडियावर सलमान खान याच्यासोबत एक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘टाइगर जिंदा है और लंदन में है…’ असं लिहिलं आहे. दोघांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Tiger is Alive and is in London
ટાઇગર ઝિંદા હૈ ઔર લન્ડન મેં હૈ.
टाइगर ज़िंदा है और लंदन में है.
ٹائیگر زندہ ہے اور لندن مے ہے
A pleasure to welcome @BeingSalmanKhan to Wembley today. pic.twitter.com/xG9lVxwM1l
— Barry Gardiner (@BarryGardiner) April 29, 2024
काही दिवसांपूर्वी सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर पहाटे दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. ज्यामुळे परिसरात खळबळ माजली होती. भाईजानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यामुळे चाहते दखील चिंतेत होते. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं असून अभिनेत्याच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. याआधी देखील सलमान खान याला जीवेमारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत.
सलमान खान याने ईदच्या मुहूर्तावर आगामा ‘सिकंदर’ सिनेमाची घोषणा केली आहे. सिनेमाच्या शुटिंगची देखील सुरुंवात झाली आहे. सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी साजित नाडियाडवाला यांच्या खांद्यावर आहे. चाहते देखील सलमान खान याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.
अभिनेता सलमान खान सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेता सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्याच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.