मुंबई | 26 जानेवारी 2024 : अभिनेता सलमान खान याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. सलमान खान त्याच्या सिनेमांमुळे कायम चर्चेत असतो. पण भाईजान संकटाच्या वेळी अनेकांच्या मदतीला धावत जातो. आता देखील एका कॅन्सरग्रस्त चिमुकल्याच्या भेटीला सलमान खान पोहोचला. एवढंच नाही तर, सलमान खान याने चिमुकल्याला दिलेलं वचन देखील पूर्ण केलं. सलमान खान याने भेट घेतलेल्या कॅन्सरग्रस्त चिमुकल्याचं नाव जगनबीर असं आहे.
सलमान खान याने जगनबीर आणि त्याच्या कुटुंबियांसोबच गप्पा मारल्या. सलमान आणि जगनबीर यांनी जवळपास 30 मिनिटं गप्पा मारल्या. मिळालेल्या माहितीनुसार, जगनबीर वयाच्या चौथ्या वर्षापासून ट्यूमर या गंभीर आजाराचा सामना करत आहे.
2014 मध्ये जगनबीर याला भेटण्यासाठी सलमान मुंबई येथील टाटा मेमेरियल रुग्णालयात पोहोचला होता. तेव्हा सलमान पहिल्यांदा जगनबीर याला भेटला. ट्यूमरमुळे जगनबीर याची दृष्टी देखील गेली होती. जगनबीर सुरुवातीपासून सलमान खान याचा चाहता आहे. जगनबीर याने रुग्णालयातून एक व्हिडीओ तयार केला होता आणि सलमान खान याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.
जगनबीर यांच्यावर किमोथेरपी सुरु होती. तेव्हा सलमान खान पहिल्यांदा जगनबीर याला भेटला होता. तेव्हा जगनबीर याची प्रकृती फार गंभीर होती. सलमान खान आपल्याला भेटण्यासाठी आला आहे… यावर जगनबीर याला विश्वासच बसत नव्हता…
2018 मध्ये सलमान खान याने जगनबीर याला एक वचन दिलं होतं. तू एका शूरवीराप्रमाणे तुझ्या आजारावर मात करत… मी पुन्हा तुला भेटण्यासाठी येईल… असं वचन सलमान याने जगनबीर याला दिलं होतं. अखेर सलमान खान याने 2024 मध्ये जगनबीर याला दिलेलं वचन पूर्ण केलं आहे.
सलमान खान याच्या टीमने जगनबीर याच्या कुटुंबियांसोबत संपर्क साधला आणि त्यांना भाईजानच्या घरी भेटण्यासाठी बोलावलं… आनंदाची गोष्ट म्हणजे जगनबीर याची प्रकृती स्थिर आहे. उपचारानंतर जगनबीर याची दृष्टी देखील परत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान आणि जगनबीर यांच्या भेटीची चर्चा रंगली आहे.