मुंबई : 26 सप्टेंबर 2023 | अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील अभिनेता एका महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आला आहे. आता सलमान खान त्याच्या कोणत्या सिनेमामुळे किंवा त्याच्या खासगी आयु्ष्यामुळे चर्चेत आला नसून भाचीमुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खान याने भाची अलीजेह अग्निहोत्री हिला अनोख्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि मन लावून कोणतंही काम करण्याचा सल्ला अभिनेत्याने भाचीला दिला होता… आता सलमान खान याची भाची देखील मामा प्रमाणे बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याची प्रयत्न करत आहे.
सलमान खान याची भाची अलिजेह बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. ‘फर्रे’ सिनेमाच्या माध्यमातून अलीजेह बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सिनेमाची निर्मिती खुद्द सलमान खान याने केली आहे. ‘फर्रे’ सिनेमाचा टीझर देखील प्रदर्शित झाला आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे खुद्द सलमान खान याने सोशल मीडियावर भाचीच्या पहिल्या सिनेमाता टीझर पोस्ट केला आहे. पहिल्या पोस्टमध्ये सलमान खान म्हणाला, ‘सकाळी एका नवा शब्द ‘फ’ शिकलो.. याबद्दल सायंकाळी ४ वाजता सांगेल…’ अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. भाईजान याच्या पोस्टमुळे चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली होती.
‘फर्रे’ सिनेमाचा पोस्टर पोस्ट केल्यानंतर सलमान खान याने इन्स्टाग्रामवर टीझर प्रदर्शित केला. भाचीच्या सिनेमाचा टीझर पोस्ट केल्यानंतर अभिनेत्याने कॅप्शनमध्ये, ‘मी तर फक्त ‘फ’ या शब्दाबद्दल बोलत होतो… तुम्ही काय विचार केला.. #farrayTeaser आउट नाउ…|’ असं म्हणाला..
सलमान खान याची भाची अलिजेह हिचा पहिला सिनेमा शाळेच्या आयुष्यावर आधारलेला असल्याचं दिसत आहे. टीझरच्या सुरुवातीला काही विद्यार्थी वर्गात कॉपी करताना दिसत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आलिजेह हिच्या नव्या सिनेमाची चर्चा रंगली आहे..
सलमान खान लवकरच ‘टायगर ३’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सलमान खान याच्यासोबत अभिनेत्री कतरिना कैफ महत्त्वाच्या भूमिकेत झळकरणार आहे. सिनेमात अभिनेता इमरान हश्मी देखील झळकणार असल्याची चर्चा रंगील आहे.