अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी सिनेमे तर कधी खासगी आयुष्यामुळे चर्चेत असणारा सलमान खान आता प्रकृतीमुळे चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर सलमान खान याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्याला पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. सांगायचं झालं तर, 5 सप्टेंबर रोजी अभिनेता ‘बिग बॉस 18’ शोचा प्रोमो शूट करण्यासाठी पोहोचला होता. तेव्हा सलमान खानला पाहिल्यानंतर चाहत्यांनी आणि पापाराझींनी मोठी गर्दी केली.
काळा सूट आणि निळ्या रंगाच्या शर्टमध्ये सलमान खान याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पण व्हिडीओमध्ये सलमान खान सतत त्याच्या बरगड्यांना हात लावताना दिसला. शिवाय अभिनेत्याने फोटोग्राफर्सना हळू फोटो क्लिक करण्यासाठी सांगितलं. सलमान खान म्हणाला, ‘सर्वांनी संभाळून आरामात फोटो घ्या… दोन बरगड्या तुटल्या आहेत….’
पण अभिनेत्याच्या बरगड्यांना नक्की काय झालं आहे कळू शकलेलं नाही. गंभीर दुखापत झाली असली तरी, अभिनेता ‘बिग बॉस 18’ शोच्या शुटिंगसाठी पोहोचला. सध्या अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते देखील अभिनेत्याच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट करत चिंता व्यक्त करत आहेत.
अभिनेता सलमान खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 58 व्या वर्षी देखील अभिनेता झगमगत्या विश्वात सक्रिय आहे. आजपर्यंत इंडस्ट्रीमध्ये सलमान खान याची जागा कोणताच अभिनेता घेऊ शकलेला नाही. सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, भारताबाहेर देखील फार मोठी आहे.
अभिनेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. सलमान खान याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘सिंकदर’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.