मुंबई : 28 ऑक्टोबर 2023 : अभिनेता सलमान खान कायम त्याच्या दोन भावांच्या खासगी आयुष्यावर बोलताना दिसतो. अभिनेता अरबाज खान आणि अभिनेता सोहेल खान यांनी अनेक वर्ष सुखी संसार केल्यानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आता खान कुटुंबाच्या दोन्ही सुना त्यांचं खासगी आयुष्य आनंदाने जगत आहेत. दरम्यान सोहेल खान याची पहिली पत्नी सीमा सजदेह हिने घटस्फोटानंतर मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सीमा हिने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, घटस्फोटानंतर खान कुटुंबाच्या दोन्ही सुनांनी मौन बाळगलं होतं. पण आता कुटुंबाच्या लहान सुनेने मौन सोडलं आहे. जेव्हा सीमा आणि सोहेल यांचा घटस्फोट झाला तेव्हा, सीमा हिने स्वतःच्या फायद्यासाठी खान कुटुंबासोबत नातं जोडलं आणि ध्येय साध्य झाल्यानंतर कुटुंबापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला… अशा अनेक चर्चा रंगल्या.
मुलाखतीत सीमा हिने स्वतःवर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. ‘मझा मुलगा निर्वान अशा वयात होता, तेव्हा त्याला भांडणं नको होती. पण एक अशी वेळ आली तेव्हा अंतिम निर्णय घेण्यची वेळ आली.’ सलमान खान याचं कुटुंब कायम त्यांच्यात असलेल्या प्रेमामुळे चर्चेत असतो. पण दोन्ही सुनांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वांना मोठा धक्का बसला…
सीमा म्हणाली, ‘जर तुम्ही तुमच्या नात्यात आनंदी नसाल, सतत भांडणं – वाद होत असतील तर, याचा मुलांवर फार वाईट परिणाम होतो. त्यामुळे योग्य निर्णय घेण्याची फार गरज असते. मला देखील माझं लग्न किंवा मुलगा दोघांमध्ये एकाला निवडायचं होतं. कारण माझा मुलगा वाईट मार्गाला जात होता आणि त्याची मला प्रचंड भीती वाटत होती…’
‘एक दिवस मला जाणवलं लग्न टिकवण्यासाठी मेहनत घेवू की, मुलावर लक्ष केंद्रित करु… तेव्हा मी निर्वान याच्यासोबत अनेक गोष्टींवर चर्चा केली. जेव्हा तो शिक्षणासाठी गेला तेव्हा, तो मला म्हणाला, आई मी आता ठिक आहे, तू मूव्हऑन करू शकतेस…’ सध्या सर्वत्र सोहेल खान आणि सीमा सजदेह यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.