मुंबई : अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा गेल्या आठवड्यात ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. पण भाईजानच्या सिनेमा प्रेक्षकांच्या मना भक्कम स्थान निर्माण करु शकला नाही. अनेक दिवसांनंतर अभिनेता सलमान खान याचा ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सलमान चाहत्यांच्या भेटीस आला. ईदचं मुहूर्त साधत अभिनेत्याचा सिनेमा प्रदर्शित झाला. पण यावेळी भाईजान प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास अपयशी ठरल्याचं समोर येत आहे.
‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होवून ११ दिवस झाले आहे. १० दिवसांत सिनेमा फ्लॉप होईल ती हीट होईल याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो. अशात सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा बॉक्स ऑफिस फेल झाला आहे. काही वर्षांपूर्वी सिनेमा १०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये पोहोचला म्हणजे फार मोठी गोष्ट होती.
पण आता चित्र पूर्णपणे बदललं आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या कमाईचे १० दिवसांचे आकडे समोर आले आहेत. ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी चाहत्याांना सलमान खान याच्याकडून अपेक्षा होत्या. पण सलमान ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करण्यास अपयशी ठरला आहे.
SacNilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, भाईजानच्या ,सिनेमाने 10 व्या दिवशी 4.50 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. ही आकडेवारी शनिवारच्या तुलनेत चांगली आहे. दुसरीकडे, आत्तापर्यंतच्या एकूण कमाईबद्दल बोलायचं झालं तर, ‘किसी का भाई किसी की जान’ 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या सिनेमाने 100.30 कोटींची कमाई केली आहे.
सिनेमा प्रदर्शनाच्या दोन – तीन दिवसांनंतर 100 कोटी रुपयांची कमाई करेल असं निर्मात्यांना आणि चाहत्यांना असं वाटत होतं. बॉक्स ऑफिसवर सिनेमाचे आकडे पाहाता निर्मात्यांची निराशा झाली आहे. सलमान खानच्या सिनेमाच्या वर्ल्डवाइड कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, ‘किसी का भाई किसी की जान’ने 150 कोटींचा आकडा पार केला आहे.
‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा भारतात एकून 4 हजार 500 स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला आहे. एवढंच नाही तर, परदेशाच सिनेमा 1 हजार 200 प्रदर्शित करण्यात आला आहे. असं असताना देखील सिनेमा समाधानकारक कमाई करु न शकल्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शकांनी निराशा व्यक्त केल्याची चर्चा जोर धरत आहे.