KKBKKJ | ‘या’ ५ कारणांमुळे फेल ठरला सलमान खान याचा ‘किसी का भाई किसी की जान’

| Updated on: Apr 29, 2023 | 10:47 AM

सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाला प्रेक्षकांचा नापसंती! सिनेमातील 'या' पाच चुकांमुळे भाईजान फेल... सध्या सर्वत्र सलमान खान आणि सिनेमाची चर्चा...

KKBKKJ | या ५ कारणांमुळे फेल ठरला सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान
Follow us on

मुंबई : अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा गेल्या आठवड्यात ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. पण भाईजानच्या सिनेमा प्रेक्षकांच्या मना भक्कम स्थान निर्माण करु शकला नाही. अनेक दिवसांनंतर अभिनेता सलमान खान याचा ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सलमान चाहत्यांच्या भेटीस आला. ईदचं मुहूर्त साधत अभिनेत्याचा सिनेमा प्रदर्शित झाला. पण यावेळी भाईजान प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास अपयशी ठरल्याचं समोर येत आहे. तर सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाला प्रेक्षकांनी नापसंती का दर्शवली याबद्दल जाणून घेवू… कोणत्या पाच चुकांमुळे सिनेमा अपयशी ठरला.

१. प्रत्येकाला माहिती आहे की सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा दाक्षिणात्य ‘वीरम’ सिनेमाचा रिमेक आहे. दाक्षिणात्य ‘वीरम’ सिनेमा असंख्या लोकांनी पाहिला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाला अधिक महत्त्व दिलं नाही. ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमात ‘वीरम’ सिनेमाचे सीन देखील कॉपी केले आहेत.

२. सिनेमातील कोणतीच गोष्ट किंवा सीन प्रेक्षकांच्या मनाला भिडला नाही. सिनेमात विश्वास न बसणारे स्टंट दाखवण्यात आले आहेत. ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमात कोणत्याचं प्रकारच्या लॉजिकचा वापर करण्यात आलेला नाही.

३. सिनेमात तगडी स्टार कास्ट असताना देखील ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अपयशी ठरला आहे. सिनेमात पूजा हेगडे, राघव जुयाल, जस्सी गिल, सिद्धार्थ निगम, जगपता बाबू, वेंकटेश, विजेंदर सिंग आणि शहनाज गिल, पलक तिवारी या मुख्य भूमिकेत झाळकले आहे.

४. ॲक्शन सीनमुळे प्रेक्षक निराश झाले आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी सलमान खान याच्यावर चित्रित करण्यात आलेले सीन प्रेक्षकांना आवडले नाही. काही अ‍ॅक्शन सीन्स फक्त सलमान खानला दाखवण्यासाठी म्हणून ठेवण्यात आले आहेत.

५. सस्पेन्स आणि थ्रिलरच्या काळात ‘किसी का भाई किसी की जान’ हा सिनेमा ज्या प्रकारे शेवटच्या टप्प्यात पोहोचतो. यावरून सिनेमाचा क्लायमॅक्स काय असणार आहे, हे स्पष्ट होतं. त्यामुळे ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाची कथा प्रेक्षकांना आवडला नाही.

‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा भारतात एकून ४ हजार ५०० स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला आहे. एवढंच नाही तर, परदेशाच सिनेमा १ हजार २०० प्रदर्शित करण्यात आला आहे. असं असताना देखील सिनेमा समाधानकारक कमाई करु न शकल्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शकांनी निराशा व्यक्त केल्याची चर्चा जोर धरत आहे.