मुंबई : 15 सप्टेंबर 2023 | अभिनेता सलमान खान (salman khan) याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान बॉलिवूडवर राज्य करताना दिसत आहे. सलमान खान याच्यानंतर बॉलिवूडमध्ये असंख्या हँडसम अभिनेत्यांनी पदार्पण केलं. पण भाईजान याचं बॉलिवूडमध्ये असलेलं स्थान कोणीही घेवू शकलं नाही. आजही सलमान खान त्याच उत्साहाने चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसतो. सलमान खान याचे आगामी सिनेमे, हीट सिनेमांबद्दल चाहत्यांना सर्वकाही माहिती आहे. पण अभिनेत्याच्या गंभीर आजाराबद्दल मात्र फार कमी चाहत्यांना माहिती आहे. खुद्द सलमान खान त्याच्या गंभीर आजाराबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे.
सलमान खान एका गंभीर आजारामुळे त्रस्त होता. ‘ट्यूबलाईट’ सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्याने त्याच्या गंभीर आजाराबद्दल मोठा खुलासा केला होता. ज्यामुळे अभिनेत्याचे प्राण देखील गेले असते. ‘ट्यूबलाईट’ सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्याने सांगितलं, त्याला गंभीर आजार झाला आहे. जो जगातील सर्वात वेदनादायक आजारांपैकी एक मानला जातो.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या आजारात रुग्णाला असह्य वेदना होतात आणि रुग्ण स्वतःला संपवण्याचा देखील विचार करतो. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ट्यूबलाइट’ सिनेमादरम्यान सलमान खानने सांगितलं, भाईजान ‘ट्रायजेमिनल न्यूराल्जिया’ या धोकादायक न्यूरोलॉजिकल आजाराने ग्रस्त आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा सलमान खान या आजाराचा सामना करत होता तेव्हा त्याने अनेकदा स्वतःला संपवण्याचा देखील विचार केला होता. खुद्द सलमानने त्याच्या एका मुलाखतीत हे मान्य केले आहे. भाईजान आता या आजारातून बरा झाला असून, त्याच्या चाहत्यांची चिंता मिटली आहे.
गंभीर आजाराचा सामना केल्यानंतर सलमान खान कायम स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतो. सलमान खान रोज जीममध्ये घाम गाळतो… म्हणजे वयाच्या 57 व्या देखील सलमान खान जीममध्ये जावून व्यायम करत असतो. अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याचे अनेक सिनेमे सध्या रांगेत आहेत.
अभिनेता लवकरच, ‘टायगर ३’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेता इमरान हश्मी देखील आहे. शिवाय सिनेमात अभिनेता शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘कभी ईद कभी दिवाली’, ‘किक 2’, ‘दबंग 4’, ‘बजरंगी भाईजान’ सिनेमाचे सिक्वल देखील चाहत्यांच्या भेटीस येणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. सोशल मीडियावर देखील अभिनेता कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.