सलमान खान प्रकरणात मोठा ट्विस्ट; जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याने आता थेट…

| Updated on: Oct 21, 2024 | 7:23 PM

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानला झारखंडमधून जीवे मारण्याची धमकी आली होती. मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या व्हॉट्सअपवर ही धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्याने सलमानकडे 5 कोटी रुपयांची मागणी केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. त्यामुळे धमकी देणाऱ्याची चांगलीच तंतरली असून त्याने सपशेल लोटांगण घातले आहे.

सलमान खान प्रकरणात मोठा ट्विस्ट; जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याने आता थेट...
slaman khan
Follow us on

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानला मागच्या आठवड्यात धमकी आली होती. ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सअपवर ही धमकी देण्यात आली होती. या व्यक्तीचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं प्रकरण ताजं असतानाच सलमानला धमकी आल्याने पोलीसही अलर्ट मोडवर आले होते. पोलिसांनी या प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. सलमानला धमकी देणाऱ्याने सलमानची चक्क माफी मागितली आहे. चुकून सलमान खानला मेसेज गेला असून त्याबद्दल मी माफी मागतो, असं या व्यक्तीने म्हटलं आहे.

भाईजान सलमान खानला धमकी आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. झारखंडमधून हा मेसेज आल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं. त्यामुळे मुंबई पोलिसांनी झारखंड गाठलं होतं. मेसेज करणाऱ्याने आपण लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा दावा केला होता. तसेच सलमान आणि बिश्नोई दरम्यान समझौता करून देण्यास तयार असल्याचंही त्याने म्हटलं होतं. त्यामुळेच पोलिसांनी मेसेज करणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.

5 कोटींची मागणी

मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवर सलमानला धमकी देणारा मेसेज करण्यात आला होता. सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यात अनेक वर्षांपासून वाद आहे. त्यामुळे हा वाद सोडवण्यास मी तयार आहे. मला पाच कोटी रुपये दिले तर दोघांमध्ये मी समझौता घडवून आणू शकतो, असं मेसेज करणाऱ्याने म्हटलं होतं, असं एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने म्हटलं होतं.

बाबांसारखे हाल होतील

माझ्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका. सलमानला जिवंत राहायचं असेल आणि लॉरेन्स बिश्नोईसोबतची दुश्मनी संपवायची असेल तर मला 5 कोटी रुपये द्या. जर पैसे दिले नाही तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट होईल, असं या मेसेजमध्ये म्हटलं होतं.

पोलीस अलर्ट

दरम्यान, वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवर आलेल्या या मेसेजला मुंबई पोलिसांनी अत्यंत गंभीरपणे घेतलं होतं. पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची पार्श्वभूमी असल्याने पोलिसांनी नंबर ट्रेस करून थेट झारखंड गाठले होते.

काय माफी मागितली?

मुंबई पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गंभीरपणे घेतलं. त्यातच मीडियानेही या प्रकरणाला उचलून धरलं. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअपवर धमकीचा मेसेज करणाऱ्याची चांगलीच तंतरली आहे. त्याने पोलिसांकडून कारवाई होण्याच्या धाकाने माफी मागितली आहे. सलमान खानला चुकून धमकी दिली. मला तसा मेसेज पाठवायचा नव्हता. झाल्या प्रकाराबद्दल मी माफी मागतो, असं या व्यक्तीने म्हटलं आहे.