जबरा फॅन! सलमान खानला ‘आधारस्तंभ’ अन् ‘गॉडफादर’ मानणारा बॉडीगार्डचा लेक आहे तरी कोण?
सलमान खानच्या बॉडीगार्ड शेराचा मुलगा अबिर उर्फ टायगर, सलमानच्या अत्यंत जवळचा आहे. तो फिटनेसप्रेमी असून सलमानला आपला गॉडफादर मानतो. त्याचा इंस्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग आहे. असे म्हटले जाते की सलमानने अबिरला चित्रपटात लाँच करण्यासाठी सतीश कौशिक यांना विनंती केली होती आणि अबिरने "सुलतान" मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.