बॉयफ्रेंड सलमान खानसोबत यूलियाची बर्थडे पार्टी, ‘त्या’ फोटोवर म्हणाली, ‘I Love You’

| Updated on: Jul 26, 2024 | 8:15 AM

Salman Khan Girlfriend: बॉयफ्रेंड सलमान खान आणि खान कुटुंबासोबत यूलिया वंतूरचा मोठ्या आनंदात वाढदिवस साजरा, फोटो आले समोर, पण 'त्या' फोटोवर यूलिया म्हणाली, 'I Love You...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खानच्या खासगी आयुष्याची चर्चा...

बॉयफ्रेंड सलमान खानसोबत यूलियाची बर्थडे पार्टी, त्या फोटोवर म्हणाली, I Love You
Follow us on

अभिनेता सलमान खान याच्या आयुष्यात अनेक अभिनेत्री आल्या. अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यासोबत सलमान याच्या नावाची चर्चा तुफान रंगली. आज दोन्ही अभिनेत्री त्यांच्या खासगी आयुष्यात पुढे गेल्या आहेत. पण तरी देखील सलमान खान याच्यासोबत ऐश्वर्या, कतरिना यांच्या नावाची चर्चा सुरुच असते. पण आता सलमान खान गायक आणि मॉडेल यूलिया वंतूर हिला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. भाईजान याने कधीच यूलिया हिच्यासोबत असलेल्या नात्याची अधिकृत घोषणा केली नाही. पण नुकताच, सलमान खान आणि खान कुटुंबाने यूलियाचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला.

यूलिया हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सलमान खान, खान कुटुंब आणि मित्र परिवार एकाच छताखाली जमलं होतं. सध्या यूलिया हिच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पण एका फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. असा एक फोटो ज्यावर यूलिया हिने ‘I Love You’ असं लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

सध्या ज्या फोटोची चर्चा रंगली आहे, तो फोटो खान कुटुंबाचा जावई अतुल अग्निहोत्री याने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यूलिया हिच्या वाढदिवसानिमित्त जमलेल्या सर्वांचा फोटो अतुल अग्निहोत्री याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तोच फोटो री-पोस्ट करत यूलिया वंतूर हिने ‘I Love You’ आणि हार्ट इमोजी देखील पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त यूलिया वंतूर हिच्या वाढदिवसाची चर्चा रंगली आहे.

यूलिया वंतूर हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सलमान खान आनंदी दिसत होता. वाढदिवसासाठी खान कुटुंबासोबतच शेरा, गायक मिका सिंग, हिमेश रेशमिया, सोनाक्षी सिन्हा, झहीर इक्बाल देखील उपस्थित होते. वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कशी झाली यूलिया वंतूर आणि सलमान खान यांची पहिली भेट?

सलमान खान आणि यूलिया वंतूरची पहिली भेट 2010 ला डब्लिनमध्ये झाली होती. त्यानंतर यूलिया एक्स-बॉयफ्रेंडसोबत भारतात आली. पण काही महिन्यांनंतर तिनं प्रियकराशी ब्रेकअप झालं आणि काही दिवस मुंबईत राहिल्यानंतर ती परत आपल्या देशात परतली. 2012 मध्ये सलमान खानच्या सांगण्यावरून ती पुन्हा त्याला भेटायला आली.

असं म्हणतात की सलमान खाननं त्याच्या पनवेल फार्महाऊसमध्ये यूलिया हिच्या राहण्याची व्यवस्था केली होती. सिनेमात देखील यूलिया आणि सलमान यांनी एकत्र काम केलं. त्यानंतर यूलिया – सलमान यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील केलं जातं.