अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय याच्या नात्याचा चॅप्टर आज प्रत्येकाला माहिती आहे. दोघांच्या ब्रेकअपला अनेक वर्ष झाली आहेत. पण तरी देखील चाहत्यांमध्ये दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगलेल्या असतात. आता देखील सोशल मीडियावर सलमान खान याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय हिच्या एक्स-बॉयफ्रेंडचं नाव घेताच, सलमान खान याने दिलेली प्रतिक्रिया सध्या तुफान चर्चेत आहे. सांगायच झालं तर, सलमान खान याचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ जुना आहे, पण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की सलमान खान कोणत्या तरी सिनेमाच्या प्रमोशनसाठी आला असावा. व्हिडीओमध्ये महिला भाईजानला म्हणाल्या, ‘तू विवेक ओबेरॉय याला कधीच माफ करणार नाही बरोबर…’ यावर सलमान म्हणतो, ‘कोण विवेक ओबेरॉय?’
सलमान खान याने विवेक याला ओळखण्यास नकार दिल्यानंतर, महिला पुन्हा म्हणाल्या, ‘तुला विवेक तुझ्या आयुष्यात नकोच नाही, त्याच्यासोबत तुझे काहीही संबंध नाहीत?’ यावर सलमान म्हणतो, ‘कोण विवेक मी ओळखत नाही…’ भाईजानच्या प्रतिक्रियेनंतर सर्वत्र अभिनेत्याची चर्चा रंगली आहे.
सलमान खान याच्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘सलमान खान याच्यासोबत कोण पंगा घेईल…’, तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सलमान खान बेस्ट अभिनेता आहे..’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याची चर्चा रंगली आहे.
एक काळ असा होता जेव्हा फक्त बॉलिवूडमध्येच नाहीतर, चाहत्यांमध्ये देखील सलमान – ऐश्वर्या यांच्या नात्याच्या चर्चा रंगलेल्या होत्या. दोघे देखील एकमेकांवर प्रचंड प्रेम करत होते. पण दोघांचं नातं कधीच लग्नापर्यंत पोहोचलं नाही. सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर, ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. ऐश्वर्या – अभिषेक यांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव आराध्या बच्चन असं आहे.
तर सलमान खान वयाच्या 58 व्या वर्षी देखील एकटाच आहे. सलमान खान बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना डेट केलं आहे. अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्यापासून अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यापर्यंत सलमान याने अभिनेत्रींना डेट केलं आहे. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत सलमान याचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. सलमान खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो.