सलमान खानची लहान आणि लाडकी बहीण अर्पिता खान हिचा पती आयुष शर्मा सध्या चांगलाच चर्चेत आलाय. हेच नाही तर सोहेल खान आणि अरबाज खान आयुष शर्माला जिजू म्हणतात. बाॅलिवूडचे प्रसिद्ध रायटर सलीम खान यांचा जावाई आयुष शर्मा आहे. मात्र, असे असले तरीही आयुष शर्मा हा एखादा चित्रपट साईन करताना या कोणासोबतही चर्चा करत नाही. नुकताच आयुष शर्मा याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीत काही मोठे खुलासे आयुष शर्माने केले. आता आयुष शर्मा याच्या या विधानांची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. हेच नाही तर आयुष शर्माचे बोलणे ऐकून लोक हैराण देखील झाले.
आयुष शर्माला विचारण्यात आले की, जर तुम्हाला एखाद्या चित्रपटाची आॅफर असेल तर तो चित्रपट साईन करण्याच्या अगोदर तुम्ही कोणाशी चर्चा करता. यावर आयुष शर्मा म्हणाला की, माझ्याकडे एक पाळीव कुत्रे असून त्याचे नाव मिस्टर पॉटर आहे. मी जर सर्वात जास्त कोणाशी बोलत असेल तर मी त्याच्याशीच बोलतो. हेच नाही तर तो रात्री माझ्या रूममध्ये झोपतो. तो माझ्या सर्वात जास्त जवळचा आहे.
मी सकाळी रोज उठल्यानंतर जर कोणाचा चेहरा सर्वात अगोदर बघत असेल तर त्याचाच चेहरा बघतो. तो मला सर्वात जास्त एक्सप्रेसिव वाटतो. मला त्याच्यासोबत बोलायला खूप जास्त आवडते. मी त्याच्यासमोरच एखाद्या चित्रपटाची स्टोरी वाचतो आणि विचार करतो की एक प्रेक्षक म्हणून ही स्टोरी कशी आहे. जर मग मला वाटले की, हो ही स्टोरी प्रेक्षक म्हणून छान आहे तर मग मी लगेच चित्रपटाला होकार देतो.
आता आयुष शर्माच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. आयुष शर्मा हा काही दिवसांपासून सतत चर्चेत देखील दिसतोय. आयुष शर्माचा ‘रुसलान’ हा चित्रपट संपूर्ण खान कुटुंबियांनी अगोदरच बघितला आहे. सलमान खान याला देखील हा चित्रपट खूप जास्त आवडलाय. आयुष शर्मा हा सोशल मीडियावर सक्रिय असून सोशल मीडियावर त्याची मोठी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.
अरबाज खान आणि शूरा खान यांचे लग्न देखील आयुष शर्मा आणि अर्पिता खान यांच्याच घरी झाले. अरबाज खानच्या लग्नाला अत्यंत जवळचेच लोक उपस्थित होते. अरबाज आणि शूराच्या लग्नाचे काही फोटोही व्हायरल झाले. काही दिवसांपूर्वीच अर्पिता खान आणि आयुष शर्माच्या बाळाचा वाढदिवस मुंबईमध्ये अत्यंत खास पद्धतीने पार पडला. या वाढदिवसाला बऱ्याच कलाकारांनी हजेरी देखील लावली होती.