अभिनेत्री समांथाच्या वडिलांचे काल (29 नोव्हेंबर2024) निधन झालं. तिने तिच्या सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत ही बातमी दिली. ही बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आणि वाईटही वाटलं. सर्व चाहत्यांनी, तिच्या मित्र-मैत्रिणींनी तिला धीर देणाऱ्या पोस्ट शेअर केल्या.
वडिलांबद्दल नेहमी तोंडभरून बोलणारी समांथा त्यांच्या जाण्याने पुरती खचली आहे. तिच्या वडिलांच्या मनात तिच्या घटस्फोटाविषयी नाराजी होती. समांथा आणि नागा चैतन्य या दोघांनी पुन्हा एकत्र यावं अशी त्यांची इच्छा होती. समांथानेही बऱ्याचदा तिच्या कमेंटमधून, पोस्टमधून याबद्दल तिच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
समांथाने तिच्या भावना अशाच एका कवितेतून व्यक्त केल्या होत्या. ती कविता सोशल मीडियावर खूप व्हायरलही झाली. इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने एक कविता पोस्ट केली होती. लेखक रुडयार्ड किपलिंग यांची ही कविता असून समांथाने या कवितेची दोन पाने पोस्ट केली आहेत. ही एक प्रेरणा देणारी कविता आहे.
“जेव्हा तुम्ही सर्व काही गमावत असाल आणि तुमच्यावर दोषारोप करत असाल तेव्हा तुम्ही डोके ठेवू शकत असाल तर, जेव्हा सर्व लोक तुमच्यावर शंका घेतात तेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवू शकता” अशा काहीशा तिच्या कवितेच्या ओळी असून तिने ही कविता पोस्ट करत त्याला “या कवितेने कायम मला योग्य मार्ग दाखवण्याचे काम केले आहे आणि मला ही कविता तुमच्याबरोबरही शेअर करावी वाटते.” असं कॅप्शनही दिलं आहे..
दरम्यान या किवतेवर अनेकांनी कमेंटस् केल्या. मात्र या कवितेवर अर्जुन कपूरने केलेली कमेंट व्हायरल झाली. त्याने लिहिलं होतं की “या कवितेची एक प्रत मी माझ्या घरातील एका भिंतीवर लावलेली आहे. जेव्हा मला प्रेरणेची गरज होती, तेव्हा खरोखर या कवितेची फार मदत झाली.”
वडिलांच्या जाण्यानंतर समांथाला पुन्हा एकदा हिंमतीने उभे राहण्याची गरज आहे. त्यावेळीदेखील ही कविता तिला मदत करेल हे नक्की. समांथाच्या कामाविषयी बोलायचे झाल्यास, ती नुकतीच बॉलीवूड अभिनेता वरुण धवनबरोबर ‘सिटाडेल: हनी बनी’ या सिरीजमध्ये झळकली. सध्या समांथाची ‘रक्त ब्रह्मांड: द ब्लडी किंगडम’ या आगामी प्रोजेक्टची शूटिंग सुरु आहे.