Love Life | समंथा रुथ प्रभू – नागा चैतन्य पुन्हा आलेले एकत्र? अभिनेत्रीच्या शरीरावर असलेल्या टॅटूमुळे सत्य समोर

| Updated on: Oct 11, 2023 | 8:03 PM

Samantha Ruth Prabhu | सत्य फार काळ लपत नाही... नागा चैतन्य - समंथा रुथ प्रभू यांच्यातील वाद शमले? अभिनेत्रीच्या शरीरावर असलेल्या टॅटूमुळे सत्य समोर... २०२१ मध्ये नागा चैतन्य - समंथा रुथ प्रभू यांनी केली होती घटस्फोटाची घोषणा... आता पुन्हा आलेत एकत्र?

Love Life | समंथा रुथ प्रभू - नागा चैतन्य पुन्हा आलेले एकत्र? अभिनेत्रीच्या शरीरावर असलेल्या टॅटूमुळे सत्य समोर
Follow us on

मुंबई | 11 ऑक्टोबर 2023 : ग्लॅमरच्या विश्वाचं आकर्षण प्रत्येकाला असतं. पैसा, प्रसिद्धी, संपत्ती यांमुळे सेलिब्रिटी कायम चर्चेत असतात. पण झगमगत्या विश्वात कधी कोणाच्या नात्याची सुरुवात होईल आणि कधी कोणाचं घटस्फोट होईल सांगता येत नाही. सेलिब्रिटींमध्ये प्रेम होतं. त्यानंतर डेट केल्यानंतर मोठ्या थाटात गडगंज पैसा खर्च करून लग्न करतात. पण काही सेलिब्रिटी कपल्सचं नातं टिकतं, तर काहीचं नातं मात्र घटस्पोटापर्यंत पोहोचतं. असंच काही झालं आहे, अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) यांच्यासोबत. जेव्हा नागा चौतन्य आणि समंथा प्रभू यांनी घटस्फोटाची घोषणा केली, तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला. लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

नागा चैतन्य – समंथा रुथ प्रभू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोट घेतल्याची माहिती चाहत्यांना दिली. पण काही दिवसांपूर्वी नागा चैतन्य – समंथा रुथ प्रभू यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. म्हणून नागा चैतन्य – समंथा रुथ प्रभू यांच्यातील वाद शमले का? अशी चर्चा रंगू लागली. दोघांनी फ्रेंचडॉगसोबत काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

हे सुद्धा वाचा

 

 

दोघांचा एकत्र फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना नागा आणि समांथा पॅचअप झाल्याचं वाटायला लागलं. आता सामंथाने या अफवेला पूर्णविराम दिला आहे. समंथाने नागाच्या नावाचा टॅटू काढून टाकला आहे. समंथा हिने तिच्या बरगड्यांवर नागा चैतन्य याच्या टोपणनावाचं टॅटू काढला होता. नागा चैतन्य याच्यासोबत असताना अभिनेत्री शारीरावर टॅटू काढला होता.

समंथा हिच्या शरीरावर एप्रिलपर्यंत टॅटू असल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान, अभिनेत्री पहिल्या पतीच्या नावाचे टॅटू काढून टाकले आहेत. समंथा ‘सिटाडेल’च्या प्रमोशनसाठी लंडन याठिकाणी गेली होती. अशात अभिनेत्रीने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये टॅटू दिसत नसल्यामुळे नागा चैतन्य – समंथा रुथ प्रभू यांच्या एकत्र आल्याच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

सोशल मीडियावर समंथा हिने गुलाबी रंगाच्या साडीमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या बरगड्या दिसत आहेत. पण अभिनेत्रीच्या शरीरावर पहिल्या पतीच्या नावाचा टॅटू दिसत नसल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नागा चैतन्य – समंथा रुथ प्रभू यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

नागा चैतन्य – समंथा रुथ प्रभू यांचं लग्न

समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचा गोव्यात 2017 मध्ये विवाह झाला होता. हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार हा विवाह मोठ्या थाटात पार पडला. 2021 मध्ये दोघांनी वेगळे होण्याची घोषणा केली होती. ज्यानंतर चाहत्यांना चांगलाच धक्का बसला.