Video : सामंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा यांच्यामधील ‘त्या’ इंटिमेट सीनची तूफान चर्चा, व्हिडीओ व्हायरल, कुशी चित्रपटात

| Updated on: Sep 03, 2023 | 8:32 PM

सामंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा हे सध्या त्यांच्या कुशी चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे कुशी हा चित्रपट देखील मोठी कमाई करताना दिसतोय. कुशी चित्रपटाने ओपनिंग डेलाच धमाका केला. चित्रपट पुढील काही दिवसांमध्ये तगडी कमाई करेल असे सांगितले जात आहे.

Video : सामंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा यांच्यामधील त्या इंटिमेट सीनची तूफान चर्चा, व्हिडीओ व्हायरल, कुशी चित्रपटात
Follow us on

मुंबई : विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू यांच्या कुशी (Kushi) चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची क्रेझ बघायला मिळतंय. विशेष म्हणजेच कुशी चित्रपटाने पहिल्याच दिवशी आपला जलवा दाखवण्यात सुरूवात केली. विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि सामंथा रुथ प्रभू यांनी कुशी चित्रपटाच्या अगोदरही चित्रपटामध्ये एकसोबत काम केलंय. विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू यांची जोडी प्रेक्षकांना जबरदस्त आवडते. मात्र, सामंथा रुथ प्रभू हिच्या आजारामुळे कुशी चित्रपटाच्या शूटिंगला काही दिवस मोठा ब्रेक लागला.

आता 1 सप्टेंबर रोजी विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू यांचा चित्रपट रिलीज झालाय. चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय. विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू यांचा रोमान्स देखील कुशी चित्रपटात बघायला मिळतोय. नेहमीच प्रेक्षक हे विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू यांना एकसोबत पाहण्यास इच्छुक असतात.

त्यामध्येच आता कुशी चित्रपटामधील एक इंटिमेट सीनचा व्हिडीओ हा व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू यांची फुल्ल रोमँटिक केमिस्ट्री बघायला मिळतंय. कुशी या चित्रपटातील समंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा याचा बेडरूममधील सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे प्रेक्षकांना सामंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा यांची ही केमिस्ट्री जबरदस्त आवडल्याचे दिसतंय. याचाच व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. कुशी चित्रपटात दाखवण्यात आलंय की, दोघेही वेगवेगळ्या जातीचे आहेत आणि एकमेकांच्या प्रेमात पडतात.

इतकेच नाही तर थेट पालकांच्या इच्छे विरोधात जात हे दोघे लग्न करतात. कुशी चित्रपटात विजय देवरकोंडा याचे नाव विप्लव आहे तर सामंथा रुथ प्रभू हिचे नाव आराध्या आहे. सुरूवातीला लग्नानंतर यांच्यामध्ये सर्वकाही व्यवस्थितपणे सुरू असल्याचे दाखवण्यात आलंय. मात्र, नंतर नात्यामध्ये दुरावा, राग, असुरक्षितता आणि भांडणे दाखवण्यात आली आहेत.

इतकेच नाही तर शेवटी दोघांमध्ये प्रचंड अशी भांडणे देखील दाखवण्यात आली आहेत. ज्याचा शेवट अनेक प्रश्न निर्माण करतो. चाहत्यांमध्ये कुशी चित्रपटाबद्दल प्रचंड उत्साह हा बघायला मिळतोय. विशेष म्हणजे हा चित्रपट धमाका करताना देखील दिसत आहे. आता कुशी चित्रपट नेमके कोणते रेकाॅर्ड तोडतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. विजय देवरकोंडा याचे चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहेत.