मुंबई | 21 जुलै 2023 : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘पुष्पा’ सिनेमातील ‘अंटावा’ गाण्यामुळे देखील अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. पण आता अभिनेत्रीने झगमगत्या विश्वाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्रीच्या निर्णयामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. अभिनेत्री लवकरच अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबत ‘खुशी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. समंथा हिचा आगामी सिनेमा तिचा शेवटचा सिनेमा असल्याचं सांगण्यात येत आहे. २०२३ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘खुशी’ सिनेमानंतर अभिनेत्रीने झगमगत्या विश्वातून निरोप घेण्याचा निर्णय घेतला. शिवाय अभिनेत्रीने अध्यात्माचा मार्ग धरला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी समंथा हिने तिच्या गंभीर आजाराबाबत मोठा खुलासा केला होता. Myositis नावाच्या गंभीर आजाराचा अभिनेत्री सामना करत आहे. ज्यामुळे अभिनेत्रीला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. एक दिवस असा होता जेव्हा अभिनेत्री चालता – फिरता देखील येत नव्हातं..
समंथा हिने प्रकृती स्थिर नसल्यामुळे अभिनयापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या अभिनेत्रीने फक्त स्वतःवर आणि प्रकृती सुधारण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. पण नुकताच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, झगमगत्या विश्वाचा निरोप घेणं अभिनेत्रीला महागात पडलं आहे. अभिनेत्री चक्क १० ते १२ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
समंथा हिने सिनेविश्वातून ब्रेक घेतला असला तरी, अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. समंथा तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचत असते. सिनेमांशिवाय अभिनेत्री जाहिराती आणि इतर मार्गांनी देखील मोठी कमाई करते. पण अभिनयाला राम राम ठोकल्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे.
समंथा हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच ‘खुशी’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेत्रीसोबत विजय देवरकोंडा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात दोघांचे रोमाँटिक सीन असल्यामुळे सिनेमा प्रदर्शनापूर्वी चर्चेत आला आहे. सध्या सर्वत्र समंथा हिच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगत आहे.