तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करणारा अभिनेता अर्थात गुरुचरण सिंग हा गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. अभिनेता बेपत्ता होऊन आता आठ दिवसांपेक्षाही अधिक कालावली झालाय. 22 एप्रिल 2024 रोजी गुरुचरण सिंग हा दिल्लीवरून मुंबईला जाण्यासाठी निघाला होता. मात्र, गुरुचरण सिंग विमानतळापर्यंत देखील पोहचला नाही. अभिनेता बेपत्ता झाल्यानंतर चाहत्यांमध्ये मोठी खळबळ बघायला मिळाली. गुरुचरण सिंग याने अनेक वर्षे तारक मेहता मालिकेत सोढीची भूमिका साकारली. अभिनेत्याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.
सोढी बेपत्ता झाल्यानंतर तारक मेहता मालिकेतील कलाकारांना देखील मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळत आहे. नुकताच तारक मेहता मालिकेत सोढीच्या मुलाची भूमिका साकारणारा अभिनेता समय शाह याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये समय शाह काही मोठे खुलासे करताना दिसलाय. आता गोगीच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
समय शाह म्हणाल की, माझी आणि गुरुचरण सिंग यांची भेट दिलीप जोशी यांच्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये झाली. यावेळी आम्ही बऱ्याच वेळ गप्पा मारत बसलो. हेच नाही तर चार पाच महिन्यांपूर्वीच आमचे फोनवर देखील बोलणे झाले, यावेळी आम्ही एक तासांपेक्षाही अधिक वेळ गप्पा मारत बसलो होतो. ते मला त्यांच्या मुलासारखे मानतात.
हेच नाही तर ज्यावेळी माझे आणि त्यांचे बोलणे झाले, त्यावेळी ते माझे मनोबल वाढवत होते. ज्यावेळी माझे आणि त्यांचे बोलणे झाले, त्यावेळी ते खूप खुश होते. बरेच लोक बोलत आहे की, ते डिप्रेशनमध्ये होते, पण मला तसे अजिबातच वाटत नाही. ते त्याप्रकारचे अजिबात नाहीत. पण एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात काय सुरू आहे हे सांगणे फार अवघड आहे.
माझे आणि त्यांचे बोलणे झाले त्यावेळी ते ठिक होते. ते कायमच माझ्याबद्दल विचारणा करत असतं. मला वाटत नाही ते डिप्रेशनमध्ये वगैरे नसतील. समय शाह याने हे देखील सांगितले की, गुरुचरण सिंग हे बेपत्ता झाल्याचे ऐकल्यापासून त्याला मोठा धक्का बसलाय. सुरूवातीला मी यावर अजिबातच विश्वास ठेवाला नाही, परंतू यानंतर मला याबद्दल समजले, असेही समय शाहने म्हटले.
गुरुचरण सिंग 2020 मध्येच तारक मेहता मालिका सोडली. मात्र, असे असतानाही लोक आजही गुरुचरण सिंगला सोढीच्याच नावाने ओळखतात. गुरुचरण सिंग सोशल मीडियावरही सक्रिय होता. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करत. चाहते आता गुरुचरण सिंग याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करताना दिसत आहेत.