बॉलिवूडचा सुपरस्चार सलमान खान यांंचं नाव इंडस्ट्रीमधील अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. पण सलमानने कधीची याला अधिकृत दुजोरा दिला नाही, सलमान खानने आजही लग्न केलेले नाही. यामागचं कारण त्याने कधीही सांगितलं नाही. पण याआधी त्याचं नाव एक्स गर्लफ्रेंड सोमी अली सोबत देखील जोडलं गेले होते. त्यामुळे दोघे अनेकदा चर्चेत होते. सलमान सोबत तिच्या नातेसंबंधाच्या काळात ती सतत चर्चेत होती. आता अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान सोमी अलीने सांगितले की, तिच्यामुळे सलमानचे संगीता बिजलानीसोबतचे लग्न मोडले होते. त्यानंतर तिने संगीताची माफी मागितल्याचेही सोमीने सांगितले.
टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत सोमी अलीने सांगितले की, संगीताने तिला आणि सलमानने रंगेहाथ पकडले होते. सोमी म्हणाली, ‘सलमान आणि मी माझ्या रूममध्ये बोलत होतो. त्यानंतर संगीता तेथे आली आणि ती सलमानकडे बघतच राहिली. सलमानने मला सांगितले की मी 10 मिनिटांत परत येईन. मला वाटले की तो संगीतासोबत बोलेल आणि तो तिच्याशीच लग्न करेल कारण लग्नपत्रिका आधीच छापून आल्या होत्या. पण तो परत माझ्याकडे खोलीत आला आणि म्हणाला की त्याचे संगीताशी नाते तुटले आहे आणि त्याला माझ्यासोबत राहायचे आहे.
सोमीने सांगितले की, बऱ्याच वर्षांनंतर तिने संगीताची माफीही मागितली होती. ती म्हणाला की, दोघांमध्ये एकमेकांबद्दल कोणतीही वाईट भावना नाही. सोमी म्हणाली, ‘मी तिला सांगितले की मला मनापासून माफी मागायची आहे. तेव्हा मी लहान होते आणि मला माहित नव्हते की मी काय करत आहे. अझरशी लग्न झाल्यामुळे मी आनंदी आहे, पण पुढच्याच महिन्यात तिने अझरसोबत घटस्फोट दाखल केला. मला माहित आहे की 16 वर्षांच्या सोमी अलीने चूक केली.
याआधी सोमीने एका मुलाखतीत सलमान तिचा क्रश असल्याचे सांगितले होते. बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी आणि सलमान खानसोबत लग्न करण्यासाठी ती मुंबईत आली होती. रिपोर्ट्सनुसार, सलमान आणि सोमीने 1990 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. दोघांनी बुलंद चित्रपटात एकत्र काम केले आहे.