भारतीची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सांगायचं झालं सानिया हिने टेनिसचा देखील निरोप घेतला आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सानिया हिने टेनिसमधून घेतलेल्या संन्यासाबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. टेनिसमधून निवृत्ती घेण्याचं पहिलं कारण सानिया हिचा मुलगा इझान आहे. मुलासोबत अधिक वेळ व्यतीत करता यावा म्हणून सानिया हिने टेनिसमधून संन्यास घेतला आहे. सानिया म्हणाली, खेळातील पराभवाचा खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. पण यावर कोणती चर्चा होत नाही… असं देखील सानिया म्हणाली.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सानिया म्हणाली, ‘मुलासोबत अधिक वेळ व्यतीत करता यावा म्हणून मी निवृत्तीचा निर्णय घेतला. मी आता जे काही करत आहे, ते मी माझ्या आवडीने करत आहे. माझी हैदराबादमध्ये टेनिस अकादमी आहे, काही दुबईतही… मी स्वतःला व्यस्त ठेवते पण मी मुद्दाम स्वतःला जास्त व्यस्त ठेवत नाही कारण मला माझ्या मुलासोबत वेळ घालवायचा आहे.’
पुढे सानिया म्हणाली, ‘माझ्यासाठी काही गोष्टी प्रचंड कठीण होत्या. कारण त्या काळात आपण सहसा मानसिक आरोग्याबद्दल फारसे बोलत नव्हतो… आपण नुकताच यावर चर्चा करायला सुरुवात केली आहे. स्पर्धेत रोजच्या रोज पराभवाचा सामना करणे फार कठीण होतं..’
अपयशावर देखील सानिया हिने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मी स्वतः भाग्यशाली समजते… मला माझ्या कुटुंबाकडून आणि टीमकडून समर्थन मिळालं. मन स्थिर ठेवण्याचा माझा प्रयत्न होता जेणेकरून पुढे कोणतेही नुकसान होऊ नये.’ असं देखील सानिया म्हणाली.
सानिया मिर्झा हिने पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्यासोबत लग्न केलं होतं. दोघांना एक मुलगा देखील आहे. पण सानिया – शोएब यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर सानिया मुलाचा ‘सिंगल मदर’ म्हणून सांभाळ करत आहे. तर, शोएब याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केलं आहे.