भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून सानिया मिर्झा खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सानिया मिर्झा हिने 2010 मध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्यासोबत लग्न केलं होतं. दोघांना एक पाच वर्षांचा मुलगा देखील आहे. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.
सानिया हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केलं. सना हिच्यासोबत शोएब याचं तिसरं लग्न आहे. शोएब त्याच्या खासगी आयुष्यात पुढे गेला आहे. पण सानिया मात्र सिंगर मदर म्हणून आयुष्य जगत आहे.
नुकताच, सानिया हिने देखील नव्या प्रेमाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सानिया हिने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ च्या येत्या एपिसोडमध्ये सानिया दिसणार आहे. शोचा प्रोमो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शोमध्ये सानिया हिने तिच्या रिलेशनशिपबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
शोमध्ये कपिल, सानिया हिला म्हणतो, एकदा शाहरुख खान म्हणाला होता की सानिया हिच्यावर बायोपिक तयार होणार असेल, तर मला तिचा लव्ह इंटरेस्ट प्ले करायला आवडेल… यावर सानिया म्हणाली, ‘सर्वात आधी तर मला लव्ह इंटरेस्ट शोधावं लागणार आहे…’ सध्या सर्वत्र सानिया हिच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
सानिया हिला कपिलच्या शोमध्ये पाहाण्यासाठी चाहते उत्सुक आहे. शोएब याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सानिया हिला फक्त भारताकडून नाहीतर, पाकिस्तानकडून देखील पाठिंबा मिळाला. पाकिस्तानातून देखील शोएब याच्या दुसऱ्या लग्नाचा विरोध करण्यात आला. शिवाय, पाकिस्तानी नागरिकांनी सना जावेद हिला देखील ट्रोल केलं.
सांगायचं झालं तर, घटस्फोटानंतर सानिया मुलासोबत राहात आहे. सानिया सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सानिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.