शोएब मलिक याच्या तिसऱ्या लग्नानंतर सानिया मिर्झा हिची पहिली प्रतिक्रिया, कशी आहे तिची अवस्था…

| Updated on: Jan 21, 2024 | 1:12 PM

Sania Mirza Marriage : पहिला पती शोएब मलिक याच्या अनेक विवाहबाह्य संबंधांना कंटाळलेल्या सानिया मिर्झा हिची कशी आहे अवस्था... शोएबच्या तिसऱ्या लग्नानंतर सानिया हिची पहिली प्रतिक्रिया... काय म्हणाली सानिया मिर्झा?

शोएब मलिक याच्या तिसऱ्या लग्नानंतर सानिया मिर्झा हिची पहिली प्रतिक्रिया, कशी आहे तिची अवस्था...
Follow us on

Sania Mirza : भारताची प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्या खासगी आयुष्याच्या सध्या सर्वत्र चर्चा रंगत आहेत. सानिया हिचा पहिला पती शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केलं आहे. शनिवारी शोएब याने तिसऱ्या लग्नाचे फोटो देखील पोस्ट केले. सध्या भारत आणि पकिस्तान या दोन देशांमध्ये फक्त आणि फक्त सानिया आणि शोएब यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. आता सानिया मिर्झा हिची बहीण अनम मिर्झा हिने सोशल मीडियावर एक स्टेटमेंट जारी केलं आहे. ज्यामध्ये अनम हिने सानिया हिच्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.

इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सानिया हिची बहीण अनम म्हणाली, ‘सानिया मिर्झा हिने कायम स्वतःचं खासगी आयुष्य चाहत्यांपासून गुपित ठेवलं आहे. पण आता एक गोष्ट सांगणं फार महत्त्वाचं आहे. काही महिन्यांपूर्वीच सानिया आणि शोएब यांचा घटस्फोट झाला आहे. सानिया हिने शोएब याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत… ‘

हे सुद्धा वाचा

 

 

अनम पुढे म्हणाली, ‘सध्या सानिया हिच्या आयुष्यातील प्रचंड नाजूक काळ सुरु आहे. म्हणून चाहत्यांना विनंती आहे की, सानिया हिच्या गोपनीयतेचा आदर करा. शिवाय कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका….’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सानिया हिच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे.

एकीकडे सानिया हिचा 18 वर्षांचा संसार मोडला आहे, तर दुसरीकडे, शोएब याच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, शोएब याच्या तिसऱ्या लग्नात त्याचे कुटुंबिय उपस्थित नव्हते… असा खुलासा शोएब याच्या बहिणींनी केला आहे. तर शोएब याच्या भावाने आणि वहिनीने सना हिचं लग्नाने मलिक कुटुंबात स्वागत केलं आहे. असं देखील सांगण्यात येत आहे.

सना हिच्यासोबत शोएब याचं तिसरं लग्न आहे. शोएब याने पहिलं लग्न 2002 मध्ये आयेशा हिच्यासोबत केलं होतं. त्यानंतर शोएब याने दुसरं लग्न सानिया मिर्झा हिच्यासोबत केलं. लग्नानंतर दोघे दुबई याठिकाणी राहात होते. शोएब याच्यासोबत लग्नाच्या 8 वर्षांनंतर म्हणजे 2018 मध्ये सानिया हिने मुलाला जन्म दिला. दोघांचा मुलगा आता पाच वर्षांचा आहे.