सानिया मिर्झा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत दिसत आहे. सानिया मिर्झा हिच्या आयुष्यात मोठे वादळ आले. सानिया मिर्झाचा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याने सोशल मीडियावर थेट तिसऱ्या लग्नाचे फोटो शेअर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केले. हे फोटो पाहुन सर्वांनाच मोठा धक्का बसला. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांना एक मुलगा देखील आहे. शोएब मलिक याच्यासोबतच्या लग्नानंतर सानिया मिर्झा ही दुबईला शिफ्टही झाली होती.
शोएब मलिक याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर सानिया मिर्झा हिचे नाव भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी याच्यासोबत जोडले जात आहे. हेच नाहीतर दोघे लवकरच लग्न करणार असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, यावर मोहम्मद शमी असो किंवा सानिया मिर्झा यांनी काहीच भाष्य केले नाहीये. ही अफवा असल्याचे देखील सातत्याने सांगितले जातंय.
सलमान खान याच्याबद्दल सानिया मिर्झाने मोठा खुलासा केलाय. हेच नाही तर एका चॅट शोमध्ये सानिया मिर्झा हिने थेट म्हटले की, ती सलमान खान याच्यावर प्रेम करते. हेच नाही तर तिला सलमान खान हा खूप जास्त आवडतो. परंतू तिचे सलमान खानवरील प्रेम मैत्रीचे आहे, हे देखील तिने स्पष्ट केले. सलमान खान आणि सानिया मिर्झा चांगले मित्र आहेत.
ऐश्वर्या राय हिला अनेक वर्ष सलमान खान याने डेट केले. हेच नाही तर यांच्या अफेअरची जोरदार चर्चा देखील होती. सलमान आणि ऐश्वर्या लग्न करणार असल्याचेही सातत्याने सांगितले जात होते. शेवटी यांचे ब्रेकअप झाले. सलमान खान याच्यानंतर ऐश्वर्या राय हिने बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत 2007 मध्ये लग्न केले.
शोएब मलिक याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर सानिया मिर्झा हिने अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या. घटस्फोटानंतर सानिया मिर्झा ही कपिल शर्मा याच्या शोमध्ये देखील पोहोचली. शोएब मलिक याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर आता दुबई सोडून भारतामध्ये सानिया मिर्झा शिफ्ट झाल्याचे देखील सांगितले जाते. सलमान खान याने ऐश्वर्या राय हिच्यावरच खरे प्रेम केले आणि त्यामुळेच तो लग्न करत नसल्याची चर्चा कायमच रंगताना दिसते.