भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्तेत आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सानिया सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. सानिया आयुष्यात आलेल्या कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. आता देखील सानिया हिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. स्वतःचा एक फोटो पोस्ट करत सानिया हिने मनातील भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या सर्वत्र सानिया हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
स्वतःचा हटके फोटो पोस्ट करत सानिया हिने कॅप्शनमध्ये, ‘काहीही झालं तरी… सर्वांना सामोरं जावं लागतं.’ असं लिहिलं आहे. सानिया मिर्झा हिच्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चाहते देखील सानिया हिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया व्यक्त करत आहे.
सांगायचं झालं तर, घटस्फोटानंतर सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची माहिती देत असते. एवढंच नाहीतर, सानिया हिने घराची पाटी देखील बदलली आहे, सानिया हिने बदललेल्या घराच्या पाटीचा फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केला होता. आता सानिया हिच्या घराच्या पाटीवर तिचं स्वतःचं आणि मुलगा इजहान याचं नाव लिहिलं आहे. सानिया हिच्या नव्या घराच्या पाटीचा फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
सानिया हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर शोएब याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केलं. सानिया आणि शोएब लग्नाच्या 14 वर्षांनंतर विभक्त झाले आहेत. सानिया आणि शोएब यांना एक पाच वर्षांचा मुलगा देखील आहे. सानिया कायम मुलासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
सांगायचं झालं तर, शोएब याने दुसऱ्या लग्नाचे फोटो पोस्ट केल्यानंतर फक्त भारताकडून नाहीतर, पाकिस्तानातून देखील शोएब याच्या दुसऱ्या लग्नाचा विरोध करण्यात आला. शिवाय, पाकिस्तानी नागरिकांनी सना जावेद हिला देखील ट्रोल केलं.
तर, घटस्फोटानंतर सानिया मुलासोबत राहात आहे. सानिया सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सानिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.