मुंबई | 27 जानेवारी 2024 : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक याने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत मोठ्या थाटात लग्न केलं. सना हिच्यासोबत विवाहबंधनात अडकण्यापूर्वी शोएब याने 2010 मध्ये भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्यासोबत लग्न केलं होतं. सानिया आणि शोएब यांना पाच वर्षांचा मुलगा देखील आहे. पण घटस्फोटाची घोषणा न करता शोएब याने तिसरं लग्न केल्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण आलं. खुद्द शोएब याने तिसऱ्या पत्नीसोबत फोटो पोस्ट केले.
सांगायचं झालं तर, सानिया मिर्झा हिने सोहराब मिर्जा याच्यासोबत साखरपुडा मोडत सर्वांच्या विरोधात जाऊन शोएब मलिक याच्यासोबत संसार थाटला. सानिया – शोएब यांच्या लग्नाला तिच्या मित्रांचा देखील नकार होता. सानिया कधीच शोएब याच्यासोबत लग्न करु नकोस… असा सल्ला सानिया हिला मित्र-परिवार आणि कुटुंबियांनी दिला होता.
अनेकांचा सानिया – शोएब यांच्या लग्नाला विरोध होता. पण कोणाचंही न ऐकता सानिया हिने 2010 मध्ये शोएब याच्यासोबत लग्न केलं. ज्याचा आता सानिया हिला पश्चाताप होत असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. पाकिस्तान येथील एका पत्रकाराने यावर मोठा खुलासा केला आहे.
सना आणि शोएब यांच्या लग्नानंतर पाकिस्तान येथील पत्रकार आणि सानिया यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली होती. पत्रकार म्हणाले, ‘सानिया स्वतः म्हणाली 14 वर्षांपूर्वी मित्र आणि कुटुंबियांचं ऐकलं असतं तर, आज हा दिवस आला नसता. मित्रांनी दिलेला सल्ला तेव्हा मी ऐकायला हवा होता… ते मला कायम शोएब याच्यासोबत लग्न करु नकोस असं सांगायचे…’ सर्वत्र फक्त आणि फक्त सानिया हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शोएब मलिक याच्या कुटुंबाला देखील त्याचं तिसरं लग्न मान्य नाही. शोएब मलिय याच्या तिसऱ्या लग्नात त्याचे कुटुंबिय नव्हते. तर शोएब याच्या भावाने आणि वहिनीने सना हिचं मलिक कुटुंबात स्वागत केलं असं देखील सांगण्यात येत आहे.
सध्या सर्वत्र सानिया हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. सानिया सध्या तिच्या पाच वर्षांच्या मुलासोबत दुबई याठिकाणी राहत आहे. सानिया कायम स्वतःचं खासगी आयुष्य गुपित ठेवण्याचा प्रयत्न करते. पण सोशल मीडियावर सानिया कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर सानिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.