मुंबई : सानिया मिर्झा हिच्या आयुष्यामध्ये मोठे वादळ आले. सानिया मिर्झा हिचा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्वांनाच हैराण केले. शोएब मलिक याने थेट आपल्या तिसऱ्या लग्नाचे फोटो शेअर केले. शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत तिसरा निकाह केला. हे फोटो व्हायरल होताच चाहत्यांना थेट धक्का बसला. काही दिवसांपासून सतत चर्चा होती की, सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या नात्यामधील वाद हा टोकाला गेलाय. मात्र, त्यावर सानिया मिर्झा किंवा शोएब यांनी काहीच भाष्य केले नाही.
घटस्फोटाच्या चर्चांवर भाष्य न करता थेट तिसऱ्या निकाहचे फोटोच शोएबने शेअर केले. या निकाहनंतर शोएब मलिक लोकांच्या निशाण्यावर आला. फक्त शोएब मलिक हाच नाही तर लोक सानिया मिर्झा हिला देखील खडेबोल सुनावताना दिसले. हैद्राबादमध्ये अत्यंत शाही पद्धतीने शोएब मलिक आणि सानिया मिर्झा हिचा निकाह पार पडला होता. सानिया आणि शोएबला चार वर्षाचा मुलगा देखील आहे.
सानिया मिर्झा हिने घटस्फोटानंतर अनेक पोस्ट या सोशल मीडियावर शेअर केल्या. सानियाच्या या पोस्ट बरेच काही सांगताना देखील दिसल्या. सानिया मिर्झाने इंस्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केलाय. आयुष्यामध्ये इतके काही सुरू असताना देखील सानिया मिर्झा हिने एक गोष्ट करणे अजिबात सोडले नसल्याचे तिच्या या फोटोवरून दिसतंय.
सानिया मिर्झा हिने शेअर केलेला हा फोटो जिममधील दिसतोय. सानिया मिर्झा ही कायमच आपल्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसते. सोशल मीडियावर व्यायामाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. मोठ्या धक्क्यानंतरही सानिया मिर्झा ही परत जिम करताना दिसत आहे. आता सानिया मिर्झा हिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
सानिया मिर्झा ही लग्नानंतर भारत सोडून दुबईला शिफ्ट झाली होती. अनेकदा दुबईतील व्हिडीओही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता घटस्फोटानंतर परत सानिया मिर्झा ही भारतामध्ये शिफ्ट झालीये. बऱ्याचदा सानिया मिर्झा ही सोशल मीडियावर मुलासोबतचे फोटो सोशल मीडियावर करताना देखील दिसते. सानिया परत निकाह करणारा का हा प्रश्न तिला सातत्याने विचारला जातोय.