संजय दत्त आहे 35 वर्षीय लेकीचा बाप, काय करते संजूबाबा याची मोठी मुलगी?

| Updated on: Nov 17, 2023 | 12:13 PM

Sanjay Datt Daughter : बॉयफ्रेंडच्या निधनानंतर पूर्णपणे खचली होती संजूबाबा याची लेक, 35 वर्षीय संजूबाबाची लेत आता करते तरी काय? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त त्रिशाला दत्त हिच्या आयुष्याची चर्चा... सोशल मीडियावर असते कायम सक्रिय

संजय दत्त आहे 35 वर्षीय लेकीचा बाप, काय करते संजूबाबा याची मोठी मुलगी?
Follow us on

मुंबई | 17 नोव्हेंबर 2023 : अभिनेता संजय दत्त कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्तेत असतो. सध्या संजूबाबा त्याच्या आयुष्यामुळे नाही तर, लेकीमुळे चर्चेत आला. अभिनेता सध्या तिसरी पत्नी आणि दोन मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत असला तरी, संजूबाबा कायम मोठ्या लेकीच्या आठवणीत असतो. संजय दत्त आणि अभिनेत्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची पहिली मुलही त्रिशाला झगमगत्या विश्वापासून दूर एका वेगळ्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त त्रिशाला हिची चर्चा रंगत आहे.

संजूबाबा याची मोठी मुलगी त्रिशाला सध्या अमेरिकेत आहे. आईच्या निधनानंतर त्रिशाला तिच्या आजी – आजोबांकडे गेली. आता त्रिशाला 35 वर्षांची आहे. आजही त्रिशाला अमेरिक तिच्या आजी – आजोबांसोबत राहते. त्रिशाला अमेरिकेत मानसोपचारतज्ज्ञ आहे आणि सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.

संजूबाबा याची लेक त्रिशाला झगमगत्या विश्वापासून दूर आहे. परदेशात त्रिशाला हिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. महत्त्वाची गोष्टी त्रिशाला हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करावं अशी इच्छा संजय दत्त याची देखील नाही. संजूबाबा मोठ्या मुलीपासून वेगळा राहात असला तरी, अभिनेता त्रिशाला हिला भेटण्यासाठी परदेशात जात असतो.

लेकीसोबत अभिनेत्याचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. अभिनेता संजय दत्त याची मोठी मुलगी त्रिशाला दत्त हिचे देखील फोटो सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत असतात. त्रिशाला देखील कायम तिच्या रॉयल लाईफस्टाईलमुळे चर्चेत असते.

आजपर्यंत अनेक स्टारकिड्सने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण अभिनेता संजय दत्त याची मुलगी मात्र झगमगत्या विश्वापासून फार दूर आहे. ती परदेशात तिच्या आजी – आजोबांसोबत राहते. पण सोशल मीडियावर त्रिशाला कायम सक्रिय असते.

त्रिशाला हिचं इन्स्टाग्राम अकाउंट प्रयव्हेट असला, तरी तिचे फोटो सोशल मीडिया व्हायरल होत असतात. संजूबाबाच्या लेकीच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटी देखील फेल आहेत. त्रिशाला हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. त्रिशाला हिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी त्रिशाला हिच्या बॉयफ्रेंडचं निधन झालं… तेव्हा देखील त्रिशाला तुफान चर्चेत आली होती. त्रिशाला इतर सेलिब्रिटी किड्स प्रमाणे लोकप्रिय नसली तरी, तिच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त त्रिशाला दत्त हिची चर्चा रंगली आहे.