संजय दत्त याची लेक वयाच्या 35 व्या वर्षी देखील अविवाहित, पण लग्नाआधी आई होण्यासाठी तयार? म्हणाली…

| Updated on: Jan 10, 2024 | 12:11 PM

sanjay dutta daughter : संजय दत्त याच्या पहिल्या पत्नीची मुलगी लग्नाआधी आई होण्यासाठी तयार? 35 वर्षीय संजूबाबाची लेक म्हणते..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त त्रिशाला हिच्या वक्तव्याची चर्चा... त्रिशाला दत्ता ही संजय दत्त आणि पत्नी ऋचा शर्मा यांची मुलगी आहे.

संजय दत्त याची लेक वयाच्या 35 व्या वर्षी देखील अविवाहित, पण लग्नाआधी आई होण्यासाठी तयार? म्हणाली...
Follow us on

मुंबई | 10 जानेवारी 2024 : अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची पहिली मुलही त्रिशाला झगमगत्या विश्वापासून दूर एका वेगळ्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. त्रिशाला अमेरिकेत मानसोपचारतज्ज्ञ आहे. त्रिशाला भारतात नाही तर, अमेरिकेत आजी – आजोबांसोबत राहाते. संजूबाबाची लेक प्रसिद्ध अभिनेत्री किंवा लोकप्रिय स्टारकिड नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील संजूबाबाची लेक एक मोठी कारणामुळे चर्चेत आली आहे. वयाच्या 35 वर्षी देखील अभिनेत्याची लेक अविवाहित आहे. पण त्रिशाला हिने आई होण्याची तयारी दर्शवली आहे. याचा खुलासा खुद्द संजय दत्त याच्या लेकीने केली आहे. सध्या सर्वत्र त्रिशाला आणि तिच्या आई होण्याच्या इच्छेची चर्चा सुरु आहे.

त्रिशाला हिने नुकताच इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत आक्स मी सेशन केलं. सेशन दरम्यान त्रिशाला हिने चाहत्यांच्या सर्व प्रश्नाची उत्तरं दिली. एका चाहत्यांनी त्रिशाला हिला तिच्या प्रेग्नेंसीबद्दल प्रश्न विचारला. ‘तू कधी बाळा जन्म देशील… यासाठी तुझे काही प्लॅन आहेत… तुझ्या होणाऱ्या बाळासाठी तू काही नावं ठरवली आहेस…’

चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देत त्रिशाला म्हणाली, ‘बाळासाठी माझ्या काहा योजना आहेत. मला बाळ हवं आहे. देवाने माझ्यासाठी काही योजना केल्या असतील तर, मला एक दिवस आई व्हायला आवडेल… मी माझ्या होणाऱ्या मुलांची नावे देखील ठरवली आहेत….’ योग्य वेळ आल्यानंतर संजूबाबा याची लेक आई होईल… असं खुद्द त्रिशाला हिने सांगितलं आहे.

हे सुद्धा वाचा

सांगायचं झालं तर, संजू बाबाची लेक झगमगत्या विश्वापासून दूर असली, तरी त्रिशाला सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करते. संजूबाबाच्या लेकीच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटी देखील फेल आहेत.

त्रिशाला हिच्या आईबद्दल सांगायचं झालं तर, कर्करोगामुळे ऋचा शर्मा याचं निधन झालं. ऋचा शर्मा पूर्णपणे संजय दत्त याच्या प्रेमात होती. दोघांनी लग्न देखील केलं. लग्नाच्या 1 वर्षानंतर ऋचा हिने त्रिशाला हिला जन्म दिला. पण लग्नाच्या दीड वर्षानंतर ऋषा हिचं निधन झालं. ऋचा हिचं 10 डिसेंबर 1996 रोजी निधन झालं.