मुंबई : अभिनेता संजय दत्त याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. संजूबाबा याच्याबद्दल खास किस्से जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. एक काळ असा होता जेव्हा अभिनेता त्याच्या सिनेमांमुळे कमी तर, खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत राहिला. संजय दत्त (sanjay datt) कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर संजूबाबाच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्यावर त्याचा परिणाम झाला. महत्त्वाचं म्हणजे त्याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक खुलासे केले. अभिनेत्याने त्याला ३०८ गर्लफ्रेंड्स असल्याचं देखील सांगितलं.
संजय दत्त याचं एक दोन नाही तर, तब्बल ३०८ महिलांसोबत संबंध होते. पण अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्यासोबत असलेल्या संजय दत्त याच्या नात्याची चर्चा तुफान रंगली. माधुरी दीक्षित हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेता पूर्णपणे कोलमडला होता. महत्त्वाचं म्हणजे संजय अशा अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्यांचं वादग्रस्त परिस्थितीशी फार जवळचं नातं आहे…
आज संजूबाबा कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्याच्या आयुष्यात चढ-उतार आले. जेव्हा माधुरी दीक्षित हिच्यासोबत अभिनेत्यांचं ब्रेकअप झालं तेव्हा संजूबाबाला मोठा धक्का बसला. संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांनी ‘साजन’ आणि ‘खलनायक’ यांसारख्या सुपरहीट सिनेमांमध्ये काम केलं आहे…
प्रेक्षकांनी संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या ऑनस्क्रिन जोडीला डोक्यावर घेतलं. पण खऱ्या आयुष्यात देखील दोघांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला. सिनेमात एकत्र काम करत असताना दोघे एकमेकांच्या फार जवळ आले. जेव्हा संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या नात्याची चर्चा सुरु होती, तेव्हा संजय दत्त विवाहित होता. संजय दत्त याच्या पहिल्या पत्नीचं नाव ऋचा असं आहे..
संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या नात्याची चर्चा सुरु होती, तेव्हा संजूबाबाची पहिली पत्नी कॅन्सरशी लढत होती. पण जेव्हा संजय आणि माधुरी यांच्या नात्याबद्दल ऋचाला कळालं तेव्हा ती अमेरिका सोडून मुंबईत आली. एका मुलाखतीत ऋचा म्हणाली, ‘संजय दत्त प्रचंड भावुक व्यक्ती आहे.. त्याला प्रत्येक वेळी पाठिंब्याची गरज असते.’
अशात जेव्हा माधुरी दीक्षितसोबत त्याचं ब्रेकअप झालं तेव्हा संजयला मोठा धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अभिनेत्याचे नाव समोर आल्याने संजय आणि माधुरीचे ब्रेकअप झालं. आता अभिनेता मान्यता दत्तसोबत आनंदी वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे.
दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मान्यता आणि संजय यांनी हिंदू पद्धतीत लग्न केलं. ११ फेब्रुवारी २००८ मध्ये संजय आणि मान्यता यांनी लग्न केलं. लग्न झाल्यानंतर चाहते आणि सेलिब्रिटींनी दोघांना नव्या आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
लग्नानंतर दोन वर्षांनंतर मान्यता – संजय जुळ्या मुलांचे आई – वडील झाले. मान्यता हिने एक मुलगा आणि मुलीला जन्म दिला. आता संजय पत्नी मान्यता आणि मुलांसोबत आनंदाने आयु्ष्य जगत आहे. शिवाय अभिनेता कुटुंबासोबत फोटो पोस्ट करत कायम प्रेम व्यक्त करताना दिसतो.