मुंबई | 19 डिसेंबर 2023 : सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्या चर्चा रंगल्या आहे. दाऊद इब्राहिम याच्यावर पाकिस्तान येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत असं सांगण्यात येत आहे. एवढंच नाही तर, दाऊद इब्राहिम याची प्रकृती चिंताजनक आहे. अशी माहिती देखील समोर येत आहे. रिपोर्टनुसार, दाऊद इब्राहिम याच्यावर विष प्रयोग करुन, त्याला संपवण्याचा कट रचण्यात आल्याची देखील चर्चा रंगत आहे. दाऊद इब्राहिम सध्या जीवन – मरणाची लढाई लढत आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूडमध्ये दाऊद इब्राहिम याची दहशत होती. एकदा दाऊद इब्राहिम याच्या निशाण्यावर अभिनेते मिथुन चक्रवर्ती होते. दोघांमधील प्रकरण पूर्णपणे चिघळलं होतं, पण अभिनेता संजय दत्त याने संपूर्ण प्रकरण सांभाळलं.
सांगयाचं झालं तर, दाऊद इब्राहिम हा गुन्हेगारी जगतातील फार मोठा चेहरा आहे. दाऊद याच्या एका फोन कॉलवर मोठ – मोठे गुन्हे घडले आहेत. एक काळ असा होता, जेव्हा दाऊद इब्राहिम याच्या कॉल्समुळे बॉलिवूडला त्रास व्हायचा. निर्मात्यांमध्ये दाऊदची प्रचंड भीती होती. मिथुन चक्रवर्ती यांना देखील एकदा दाऊदच्या दहशतीचा सामना करावा लागला होता. तो काळ त्यांच्यासाठी खूप त्रासदायक होता.
मिथुन चक्रवर्ती यांचा वाईट काळ सुरु झाला, जेव्हा एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत त्यांची मैत्री घट्ट झाली. अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मंदाकिनी होती. तेव्हा मंदाकिनी आणि मिथुन यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं. एवढंच नाही तर, दोघांमध्ये प्रेम देखील बहरत होतं. पण दाऊद इब्राहिम याचं देखील मंदाकिनी हिच्यावर जीव जडला होता.
दरम्यान, मंदाकिनी आणि मिथुन यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी दाऊद इब्राहिम याच्या पर्यंत पोहोचल्या होत्या. दाऊद इब्राहिम याने गुंडांना सांगून मिथून यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. असा एकही दिवस गेला नाही जेव्हा मिथुन यांना धमकीचे फोन आले नाहीत. चिंतेत असलेल्या मिथुन यांनी संपूर्ण प्रकरण अभिनेता संजय दत्त याला सांगितलं.
प्रकरणाचं गांभीर्य समजून संजय याने मिथुन यांना भविष्यात कधीही मंदाकिनी हिच्यासोबत कोणताही सिनेमा साइन न करण्याचा सल्ला दिला. मिथुन यांनी देखील मित्राने दिलेल्या सल्ल्याचं पालन केलं. त्या घटनेनंतर कधीच मिथुन यांनी मंदाकिनी हिच्यासोबत स्क्रिन शेअर केली नाही.