'झी मराठी' मर्डर मिस्ट्री कथा असलेली मालिका 'काय घडलं त्या रात्री'मध्ये सध्या रंजक वळण आले आहे.
या वळणावर लवकरच आता मालिकेत संजय जाधव यांची एंट्री होणार आहे.
सुप्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून नावारूपाला आलेले संजय जाधव या मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर अभिनेता म्हणून पदार्पण करणार आहेत.
एका सुप्रसिद्ध अभिनेत्याची आत्महत्या आणि त्यानंतर घडणाऱ्या घटनाक्रमावर आधारित या मालिकेची कथा आहे.
संजय जाधव या मालिकेत वकील 'विश्वजित चंद्रा' ही भूमिका साकारणार आहेत.