‘बॉयफ्रेंडची हत्या, आईचा अपमान, तरीही हसत राहिली…’, संजय लिला भन्साळी यांची भाची ट्रोल

| Updated on: May 06, 2024 | 10:16 AM

Sharmin Segal | लग्नाच्या दिवशी बॉयफ्रेंडची हत्या, सर्वांसमोर आईचा अपमान.., तरीही हसत राहिली शर्मिन सेगल, सोशल मीडियावर का ट्रोल होत आहे संजय लिला भन्साळी यांची भाची शर्मिन? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शर्मिन सेगल हिची चर्चा...

बॉयफ्रेंडची हत्या, आईचा अपमान, तरीही हसत राहिली..., संजय लिला भन्साळी यांची भाची ट्रोल
Follow us on

अभिनेत्री शर्मिन सेगल हिने दिग्दर्शक संजय लिला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी’ वेब सीरिजमध्ये आलमझेब भूमिका साकारली आहे तर, मनिषा कोईराला हिने मल्लिकाजान भूमिकेला न्याय दिला. सीरीजमध्ये शर्मिन मुलीच्या तर, मनिषा आईच्या भूमिकेत होती. पण आता शर्मिन हिला ट्रोल करण्यात येत आहे. शर्मिन हिच्या प्रत्येक पोस्टवर नेटकरी कमेंट करत ट्रोल करत आहेत. सतत ट्रोल होत असल्यामुळे अभिनेत्रीने कमेंट सेक्शनच बंद केलं आहे. सध्या सर्वत्र शर्मिन हिने ‘हीरामंडी’ सिनेमात साकारलेल्या भूमिकाची चर्चा रंगली आहे.

‘हीरामंडी’ वेब सीरिजमध्ये शर्मिन हिला वेश्या नाहीतर, शायरा व्हायचं होतं. पण शर्मिन नवाब ताजदार याच्या प्रेमात पडते. त्यानंतर शर्मिन हिच्या आयुष्यातील संघर्ष सुरु होतो. सीरिजमध्ये शर्मिन हिची भूमिका महत्त्वाची आहे. पण अनेकांना शर्मिन हिचा अभिनय आवडलेला नाही.

हे सुद्धा वाचा

 

 

सीरिजमध्ये आलमझेब म्हणजे शर्मिन हिच्या आयुष्यात अनेक संकटं येतात. पण अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील भाव मात्री सीनसाठी योग्य नसल्याचे प्रेक्षकांचं म्हणणं आहे. आलमझेब हिची आई मल्लिकाजान हिचा सर्वांसमोर अपमान होतो. पण तरी देखील तिच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे भाव नसतात. तर बॉयफ्रेंड ताजदार याच्या निधनानंतर देखील शर्मिन हिच्या चेहऱ्यावर दुःख दिसत नाही..

शर्मिन हिच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत एक नेटकरी म्हणाला, ‘तू संजय लिला भन्साळी यांची भाची आहेस म्हणून तुला भूमिका मिळाली. पण तू भूमिकेला न्याय देऊ शकली नाही..’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘पूर्ण सीरिजमध्ये तू फक्त हसतच आहेस… बॉयफ्रेंडचं निधन झालं. आईचा अपमान झाला, किती पुस्तकं पाण्यात गेली… तरीही तू हसतच राहिलीस… दुःख चेहऱ्यावर नव्हतंच…’

सीरिजमध्ये अभिनेत्री शरमीन सेहगल हिच्या नश उतराईसाठी अभिनेत्री मनिषा कोईराला तयारीत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. पण शर्मिन तिच्या नथ उतराईसाठी तयार नसते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘हीरामंडी’ सीरिजची चर्चा रंगली आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या सीरिजला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.