माधुरी दीक्षित-काजोल यांच्या आयुष्यातील मोठी चूक, ‘या’ अभिनेत्रीचं चमकलं नशीब, नाना पाटेकर यांच्यासोबत मारली बाजी

| Updated on: Jul 03, 2023 | 1:20 PM

माधुरी दीक्षित-काजोल त्यांच्या आयुष्यातील 'ही' चूक कधीही विसरु शकत नाही... दोघींच्या एका गोष्टीचा 'या' अभिनेत्रीला झाला मोठा फायदा... तिने नाना पाटेकर यांचा हात धरला आणि...

माधुरी दीक्षित-काजोल यांच्या आयुष्यातील मोठी चूक, या अभिनेत्रीचं चमकलं नशीब, नाना पाटेकर यांच्यासोबत मारली बाजी
Follow us on

मुंबई | बॉलिवूडमध्ये असे काही रहस्य आहेत. झगमगत्या विश्वातील काही रहस्य उलगडलं, पण काही गोष्टी आजही गुलदस्त्यात आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अभिनेत्री काजोल यांच्या चाहत्यांची संख्या आजही घटलेली नाही. पण बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर चढत असताना दोघींना स्वतःची एक चूक प्रचंड महागात पडली. ज्याच्या फायदा बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीला झाला. तर ती अभिनेत्री कोण असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच. माधुरी दीक्षित-काजोल यांच्या आयुष्यातील एका चुकीचा फायदा उचलणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मनिषा कोईराला आहे. मनिषा कोईराला देखील बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे..

१९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘खामोशी द म्यूजिकल’ (Khamoshi – The Musical) सिनेमामुळे मनिषाच्या लोकप्रियेत मोठी वाढ झाली. सिनेमात मनिषा हिच्यासोबत अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेता सलमान खान याने मुख्य भूमिका साकारली होती. ‘खामोशी द म्यूजिकल’ या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं.

‘खामोशी द म्यूजिकल’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर मजल मारू शकला नाही, पण तेव्हा ‘खामोशी द म्यूजिकल’ सर्वात जास्त पुरस्कार मिळवणार सिनेमा ठरला. अनेक वर्षांनी एक गोष्ट समोर आली ती म्हणजे, ‘खामोशी द म्यूजिकल’ सिनेमासाठी सर्वात आधी अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला विचारण्यात आलं होतं. पण अभिनेत्रीने नकार दिला.

माधुरी दीक्षित हिच्यानंतर अभिनेत्री काजोल हिला देखील सिनेमातील मुख्य भूमिकेबद्दल विचारण्यात आलं. पण काजोल हिने देखील संजय लिला भन्साळी यांना निराश केलं. अखेर मनिषा कोईराला हिने सिनेमासाठी होकार दिला आणि अभिनेत्रीनं नशीबच बदललं.

‘खामोशी द म्यूजिकल’ सिनेमानंतर १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘ सौदागर ‘ सिनेमाने तर इतिहास रचला. ‘ सौदागर ‘ सिनेमाच्या यशानंतर बॉलिवूडमध्ये फक्त आणि फक्त मनिषा कोईराला हिची चर्चा होती. ‘ सौदागर ‘ सिनेमा सुपरहिट ठरल्यानंतर मनिषा कोईराला ‘१९४२ अ लव स्टोरी’ आणि ‘बॉम्बे’ सिनेमांमध्ये देखील झळकली. महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्रीचं नाना पाटेकर यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं.

मनिषा कोईराला हिला प्रोफेशल आयुष्यात तर यश मिळालं पण, खासगी आयुष्यात मात्र अभिनेत्री चढ – उतारांचा सामना करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, मनिषा हिचं एक दोन नाही तर, चक्क १२ सेलिब्रिटींसोबत नाव जोडण्यात आलं. पण कोणासोबत ही अभिनेत्रीचं नातं लग्नपर्यंत पोहोचू शकलं नाही. शिवाय लग्नानंतर २ वर्षात अभिनेत्रीचा घटस्फोट झाला.