नेटफ्लिक्सने अखेर ‘हिरामंडी : द डायमंड बाजार’ या वेब सीरिजया ट्रेलर प्रदर्शित केला आहे. संजय लिला भन्साळी यांची पहिलीच सीरिज असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रदर्शित करण्यात आलेल्या ट्रेलरमध्ये हीरामंडी येथील शाही वातावरण दिसून येत आहे. अभिनेत्री मनिषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी आणि ऋचा चड्ढा यांनी सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. सध्या सर्वत्र ‘हिरामंडी’ सीरिजची चर्चा रंगील आहे…
कट…. राजकारण… ड्रामा… इत्यादी सीन्स भोवती फिरत असलेली ‘हिरामंडी’ सीरिजचा ट्रेलर चाहत्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सीरिजच्या ट्रेलरची सुरुवात, सिर्फ घुंघरू पहन लेने से औरत तवायफ नही होती…, दिन के और रात के सारे हुनर सिखने पडते है… या डायलॉगने होते.
ट्रेलरमधील राजवाड्याच्या चकचकीत, भव्य हॉलमध्ये रोमान्स आणि क्रांतीची शांततेने चाहत्यांना आकर्षित केलं आहे. प्रेम, विरह… या गोष्टी देखील प्रेक्षकांना संजय यांच्या ‘हिरामंडी’ सीरिजमध्ये अनुभवता येणार आहे. हिरामंडी याठिकाणी मल्लिकाजान (मनिषा कोईराला) वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची घरवाली असून हिरामंडीमध्ये तिचं शासन चालतं… सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांना आवडला आहे. आता चाहते सीरिजच्या प्रतीक्षेत आहेत.
संजय लिला भन्साळी सीरिजबद्दल म्हणाले, ‘प्रेम, ताकत आणि स्वातंत्र्याच्या हक्कासाठी लढणाऱ्या महिलांच्या आयुष्याभोवती सीरिजची कथा फिरताना दिसत आहे…’ संजय लिला भन्सळी बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक आहेत.
सांगायचं झालं तर, संजय लीला भन्साळी यांचा ओटीटीवरील पहिली सीरिज आहे. हीरामंडी स्वातंत्र्यपूर्व भारताचे आकर्षक चित्र सादर करते… मार्च रोजी, Heeramandi: The Diamond Bazaar च्या निर्मात्यांनी घोषणा केली की बहुप्रतिक्षित वेब सिरीज 1 मे रोजी Netflix वर प्रदर्शित होईल.
सीरिजच्या माध्यमातून अभिनेत्री मनिषा कोईराला अनेक वर्षांनंतर चाहत्यांच्या भेटीस आली आहे. अभिनेत्री ‘संजू’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती. सिनेमात अभिनेत्रीने संजय दत्त यांच्या आईची भूमिका साकराली होती. सिनेमाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं. सिनेमामुळे मनिषा देखील प्रसिद्धी झोतात आली होती. आता अभिनेत्री ‘हिरामंडी’ सिनेमामुळे चर्चेत आली आहे. आता चाहते 1 मे च्या प्रतीक्षेत आहेत. कारण ‘हिरामंडी 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.