‘सपने सुहाने लडकपन के’ मालिका अनेकांना माहिती असलेच. एकेकाळी मालिकेने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं होतं. मालिकेत गुंजन या भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री रुपल त्यागी तुम्हाला आज देखील आठवतच असेल… रुपल हिने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. एका मालिकेमुळे रुपल हिच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. पण मालिका संपल्यानंतर अभिनेत्री अचानक गायब झाली. मालिकेत खोडकर दिसणार रुपल आता पूर्णपणे बदलली आहे. तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
टीव्ही अभिनेत्री आणि कोरिओग्राफर रुपल त्यागीने अल्पावधीतच आपल्या अभिनयाने लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केलं होतं. पण अभिनेत्री स्वतःचं स्थान टिकवता आलं नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री झगमगत्या विश्वापासून दूर आहे. सांगायचं झालं तर, रुपल हिने हिंदी टीव्ही मालिका ‘हमारी बेटियों का विवाह’मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
‘हमारी बेटियों का विवाह’ मालिकेत अभिनेत्रीने तिने मनशा कोहलीची भूमिका साकारली होती. याशिवाय रूपलने ‘कसम से’, ‘एक नई छोटी सी जिंदगी’ आणि ‘सपने सुहाने लडकपन के’ या टीव्ही मालिकांमध्ये काम करत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रुपल हिची चर्चा रंगली आहे.
रुपल त्यागी एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली डान्सर देखील आहे. ‘झलक दिखला जा’ या रिॲलिटी टेलिव्हिजन शोच्या आठव्या सीझनमध्ये अभिनेत्री दिसली होती. याशिवाय रुपल बॉस सीझन 9 मध्ये देखील स्पर्धक म्हणून चाहत्यांच्या भेटीस आली.
रुपल हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, ब्रेकअपनंतर अभिनेत्री अनेक संकटांचा सामना केला. रुपल हिला डिप्रेशनचा सामना करावा लागला. रुपल प्रचंड उत्साही आणि आनंदी असायची पण काही दिवसांनंतर तिच्या लक्षात येवू लागलं की आपण आता खचत आहोत. पण आज रुपल स्वतःचं आयुष्य आनंदाने जगत आहे.
आता रुपय झगमगत्या विश्वात सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री इन्स्टाग्रामवर स्वतःच्या डान्सचे व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. चाहते देखील रुपल हिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.